Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे गणित समजत नाही!’ नाशिक-पुणे रेल्वे रद्द केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप; जनआंदोलनाचा इशारा
राजकारण

‘रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे गणित समजत नाही!’ नाशिक-पुणे रेल्वे रद्द केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचा संताप; जनआंदोलनाचा इशारा

या गंभीर प्रश्नावर आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना नफा-तोट्याच्या पुढचे सामाजिक आणि आर्थिक गणित समजत नसल्याचा थेट आरोप करत नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो शिर्डी-अहिल्यानगर मार्गे नेण्याच्या केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा गळा घोटणारा असल्याचा संताप व्यक्त करत सरकारच्या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी शुक्रवारी अत्यंत तीव्र शब्दांत घणाघाती टीका केली आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र नाराजी पसरली असून, याविरुद्ध व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, हा निर्णय एका सरळ आणि सोप्या प्रकल्पाला जाणीवपूर्वक गुंतागुंतीचे करण्याचे उत्तम उदाहरण आहे. नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक किंवा अहिल्यानगर जिल्ह्यापुरता मर्यादित नव्हता, तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड आणि या संपूर्ण मार्गावरील ग्रामीण भागासाठी तो जीवनदायी ठरणार होता.
या रेल्वेमुळे पुण्याच्या वाहतुकीचा आणि वाढत्या लोकसंख्येचा ताणही कमी होणार होता. मात्र, रेल्वे प्रकल्प हे केवळ १०-२० वर्षांच्या नफ्यासाठी नसून पुढील १०० वर्षांच्या विकासाची पायाभरणी असतात, याचे भान रेल्वेमंत्र्यांनी ठेवले नसल्याचे तांबे म्हणाले. जनतेच्या हक्काचा घास हिरावून घेणाऱ्या सरकारला आणि लोकप्रतिनिधींना येणाऱ्या पिढ्या कधीही माफ करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई आणि पुण्याच्या अगदी जवळ असूनही केवळ उत्तम कनेक्टिव्हिटीअभावी नाशिकचा अपेक्षित औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातील विकास रखडला आहे. हा सरळ रेल्वेमार्ग झाल्यास उद्योग, सेवा क्षेत्र आणि रोजगाराच्या अभूतपूर्व संधी निर्माण होणार आहेत. मात्र आता हा रेल्वे मार्ग रद्द झाल्याने नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर आणि खेडमधील नागरिकांनी आता रस्त्यावर उतरून लढा देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या गंभीर प्रश्नावर आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. तसेच, सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि खासदारांनी पक्षाचा दबाव झुगारून जनतेच्या बाजूने उभे राहावे, कारण लोकप्रतिनिधी म्हणून पक्ष आणि नेतृत्वापेक्षा जनहित नेहमीच मोठे असते, असे आवाहन करत त्यांनी या अन्यायाविरुद्ध एकत्र लढण्याचे आवाहन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 535
अश्विनी वैष्णव देवेंद्र फडणवीस नाशिक पुणे रेल्वे मार्ग सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar27/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील अवैध मावा आणि सुगंधीत तंबाखू बनविणाऱ्या…

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.