Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!
राजकारण

ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!

या यादीत संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, मुंबईचे संजय दिना पाटील आणि मुख्यत्वे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2026Updated:17/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नवी दिल्ली:
महाराष्ट्र आणि निष्ठावंत शिवसैनिकांशी गद्दारी करणाऱ्या ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी अखेर दिल्लीत लोटांगण घातले आहे. यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश असून, त्यांनी आपल्या दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या फुटीर खासदारांनी काल रात्रीपासूनच दिल्ली गाठून लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली आणि स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा अध्यक्षांनी या गटाला तात्काळ मंजुरी दिली असून, आता हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
काल रात्रीपासूनच ठाकरे गटाशी प्रतारणा करणारे हे फुटीर खासदार छुप्या मार्गाने एकापाठोपाठ एक दिल्लीत दाखल होत होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या गद्दारीच्या ऑपरेशनचे नेतृत्व करण्यासाठी आधीच दिल्लीत तळ ठोकून होते. दिल्लीत पोहोचताच या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी डांबून ठेवण्यात आले होते.
त्यानंतर आज सर्व ६ खासदारांनी शिंदेंच्या उपस्थितीत लोकसभा अध्यक्षांसमोर हजेरी लावली आणि त्यांच्या देखतच पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असल्याने, ठाकरे गटाच्या ९ खासदारांपैकी ६ जणांनी एकत्र येत हा कायदेशीर पळपुटेपणा केला असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’ नावाने चाललेल्या या पडद्यामागच्या खेळीला आधी दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला नव्हता. मात्र, १० जून रोजी दिल्लीत पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्यात खलबते झाली आणि या गद्दारीच्या नव्या अंकाला ग्रीन सिग्नल मिळाला. शिवसेना खासदार फोडण्याच्या या नाट्याला ऑपरेशन टायगर नाव देण्यात आले होते तर खासदार फुटी नंतर त्यांना आता ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून गद्दार संबोधले जात आहे.
त्यानंतर दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये या खासदारांच्या बैठका झाल्या. ठाकरे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांच्या या यादीत संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, मुंबईचे संजय दिना पाटील आणि मुख्यत्वे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांची पत्रावर स्वाक्षरी नसल्याची माहिती समोर येत असल्याने या दोन नावांविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,065
एकनाथ शिंदे फूट भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यादी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.