Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापेंवर दोन आठवड्यांनंतरही गुन्हा दाखल नाही; संगमनेर नगरपालिकेच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष
पत्रकारिता

अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापेंवर दोन आठवड्यांनंतरही गुन्हा दाखल नाही; संगमनेर नगरपालिकेच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष

पालिकेने पत्र देऊनही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील सुकेवाडी रोड येथे अनिकेत अशोक इथापे यांनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता आणि प्रशासनाने नोटीस बजावूनही बेकायदेशीरपणे पाच मजली (जी प्लस फोर) इमारतीचे बांधकाम केले आहे. या धोकादायक अवैध बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, या प्रकरणी इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना दोन पत्रे देऊन दोन आठवडे उलटले आहेत, तरीही अद्याप संगमनेर शहर पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
नगरपालिका प्रशासनाने संगमनेर शहर पोलिसांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, अनिकेत अशोक इथापे यांनी सर्वे नंबर १५३/१/१ येथील जागेवर कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे अनधिकृत बांधकाम केले आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५४ अन्वये सदर बांधकाम तात्काळ स्थगित करण्यासाठी आणि अनधिकृत हिस्सा काढून घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, या नोटीसची दखल न घेता बांधकाम सातत्याने सुरूच ठेवण्यात आले.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून ५ जून २०२६ रोजी पालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, पाचव्या मजल्यावर ब्लॉक बसवण्याचे काम वेगात सुरू असल्याचे दिसून आले. या बांधकामाचे सिमेंट ब्लॉक शेजारील आयुब मणियार यांच्या इमारतीवर, त्यांच्या अंगणात आणि पश्चिम बाजूच्या सार्वजनिक रस्त्यावर पडलेले आढळून आले. यामुळे परिसरात गंभीर अपघाताची आणि जीवितहानीची स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने रचना सहाय्यक वैष्णवी गडाख आणि सहाय्यक नगररचनाकार (प्रभारी) ओंकार सहाणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
सध्या संगमनेर शहराच्या विकास आणि सुशोभीकरणासाठी नगराध्यक्षांनी अतिक्रमण आणि बेकायदेशीर कामांविरोधात मोहीम हाती घेतली असून, त्याची सुरुवात या इथापे प्रकरणापासून झाली आहे. या मोहिमेअंतर्गत बस स्थानक ते बी.एड. कॉलेज रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांना हटवण्यात आले असून, पुढील कारवाई बस स्थानक परिसर आणि नवीन नगर रोडवर केली जाणार आहे. मात्र, पालिकेने पत्र देऊनही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून, शहरातील इतर भागांतील अतिक्रमण धारक, नियमबाह्य हॉस्पिटल्स आणि पार्किंग नसलेल्या बड्या मंडळींवर नगरपालिका आता कशी कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 664
अनिकेत इथापे अवैध बांधकाम इथापे हॉस्पिटल मुख्याधिकारी संगमनेर नगर परिषद संगमनेर शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.