Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश
प्रशासन

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

जर या अतिक्रमणांवर वेळेत योग्य ती कारवाई झाली नाही किंवा जागा मोकळी केली नाही, तर तीव्र उपोषण करण्याचा इशाराही अर्जदारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचा प्रकार समोर आला असून, आता या प्रकरणी महसूल विभाग आणि नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीएसएनएल (BSNL) कार्यालयाशेजारी आणि पोलीस कॉलनीसमोर असलेल्या भूमापन क्रमांक ८६/४१ मधील प्लॉटवर पसरलेले अतिक्रमण हटवण्यासाठी तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासह नगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
शासकीय भूखंडावर झालेल्या अतिक्रमण संदर्भात शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रांताधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात नमूद केल्यानुसार, सदर ८६/४१ हा प्लॉट जिल्हाधिकारी यांच्या नावे असून तो तहसीलदार, तलाठी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी राखीव आहे. सोबतच या जागेवर प्ले ग्राउंड, प्रायमरी स्कूल, मॅटर्निटी होम, हायस्कूल आणि म्युनिसिपालटी मार्केट यासारखी नगरपरिषदेची महत्त्वपूर्ण आरक्षणे आहेत. असे असतानाही या जागेवर बेकायदेशीरपणे दुकाने थाटून आणि बांधकामे करून अतिक्रमण करण्यात आले आहे.
तक्रारदारांच्या या अर्जाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसीलदार आणि संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे.
संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी संगमनेर बुद्रुकच्या तलाठी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना पत्र पाठवून जागेची अचूक हद्द व प्रत्यक्ष ताब्याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात ०.३५.०० हेक्टर आर क्षेत्र असलेल्या या जागेचा ७/१२ उतारा, फेरफार नोंदी, भूमि अभिलेख कार्यालयाकडून प्रत्यक्ष मोजणी नकाशा आणि अतिक्रमणाबाबत पूर्वी दिलेल्या नोटीसांची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे.
सरकारी जागेचा हक्क स्पष्ट करून नगरपरिषदेच्या मंजूर विकास योजनेतील आरक्षणाची पडताळणी केली जाणार आहे. जर या अतिक्रमणांवर वेळेत योग्य ती कारवाई झाली नाही किंवा जागा मोकळी केली नाही, तर तीव्र उपोषण करण्याचा इशाराही अर्जदारांनी निवेदनाद्वारे दिला आहे. प्रशासनाच्या या धडक पाऊलांमुळे आता भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील कारवाईकडे संपूर्ण संगमनेर शहराचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 241
अतिक्रमण अतिक्रमण कारवाई आरक्षण तहसीलदार प्रांत अधिकारी भूखंड मुख्याधिकारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

By Annant Ppangarkar22/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण…

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.