Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

June 16, 2026

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप
राजकारण

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

"महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फोडले गेले. बंगालमध्ये पक्ष फोडला, मतदान 'डिलीट' केले जात आहे. जिथे मतदान डिलीट होते, तिथे एका विशिष्ट पक्षाला फायदा होतो. भगतसिंग, राजगुरु यांनी आंदोलन केले असते, तर आज त्यांनाही देशद्रोही ठरवले गेले असते
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

​विशेष प्रतिनिधी / मुंबई
“केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” अशी घोषणा करणारे अभिजित दिपके यांच्यावरील हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा थेट आरोप स्वतः दिपके यांनी केला आहे. ज्यांनी हल्ला केला, त्या संघाशी संबंधित हल्लेखोरांना संघाची फूस होती, असे दिपके यांनी म्हटले आहे. अभिजित यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
​जयपूरनंतर मंगळवारी नागपुरात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अभिजित म्हणाले, “सोमवारी माझ्यावर हल्ला झाला. माझ्यावर हल्ला करणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ६ जूनला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन केले होते, तेव्हाच आम्ही अल्टिमेटम दिला आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील. २० जूनला दिल्लीत मोठे आंदोलन होणार आहे. आम्ही शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय परतणार नाही,” असा थेट इशारा अभिजित दिपके यांनी दिला आहे.
​”नीट (NEET) पेपरफुटीची कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी. मात्र, कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. मोदींना सत्तेत येऊन चार हजार दिवस झाले आहेत. या काळात त्यांनी अशा कोणत्याही ४ परीक्षा दाखवाव्यात, ज्यांचे पेपर लीक झालेले नाहीत. पेपर लीक झाल्यानंतर परीक्षा रद्द झाल्या, ज्यामुळे वैफल्यातून ५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कारवाईच्या नावावर अधिकाऱ्याची फक्त बदली केली जाते. विद्यार्थ्यांच्या जीवाची इतकीच किंमत का?” असा प्रश्न अभिजित दिपके यांनी उपस्थित केला आहे.
​”जयपूर येथे आंदोलन करत असताना माझ्यावर झालेला हल्ला हा बेरोजगारीमुळे झाला. हल्ला करणाऱ्याकडे जर चांगली नोकरी असती, तर त्याने हा हल्ला केला नसता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला. आजवर सर्वच पक्षांनी तेच केले आहे. मात्र, आज जे सत्तेत असतील त्यांना आम्ही प्रश्न तर विचारणारच. देशाच्या विद्यमान परिस्थितीला भाजपाइतकाच काँग्रेस पक्षसुद्धा जबाबदार आहे,” असे मत अभिजित यांनी व्यक्त केले.
​”पेपरफुटीच्या मागणीसाठी जर राजकीय पक्ष काढावा लागणार असेल, तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे. उद्या कोणाच्या घरामध्ये पाणी किंवा वीज येत नसेल, तर ते राजकीय पक्ष काढणार का? आपल्या देशात सध्या हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर राजकारण होत आहे. यातून युवकांना काय मिळणार? काहीच नाही. आमचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असणार आहे. आम्हाला बांगलादेश किंवा नेपाळकडे पाहण्याची गरज नाही. महात्मा गांधींनी देशात बदल घडवला होता. देशात लोकशाही टिकवण्यासाठी आंदोलन महत्त्वाचे आहे. माझ्या कुटुंबाप्रती असणाऱ्या जबाबदारीपेक्षा माझी देशाप्रती असलेली जबाबदारी मोठी आहे,” असे मत अभिजित दिपके यांनी मांडले.
​”ज्यांना देशातील युवकांची चिंता आहे, त्यांनी या आंदोलनात येऊन सहकार्य करावे. जे माझे मित्र आहेत, ते मला सहकार्य करत आहेत. मी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानतो. माझ्यावर जर कोणी हात उगारला, तरी मी हात उचलणार नाही. आंदोलनाचा मूळ मुद्दा भरकटवण्यासाठीच असे हल्ले केले जातात. सर्वांनी सहकार्य करून या आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन अभिजित यांनी केले. “महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फोडले गेले. बंगालमध्ये पक्ष फोडला, मतदान ‘डिलीट’ केले जात आहे. जिथे मतदान डिलीट होते, तिथे एका विशिष्ट पक्षाला फायदा होतो. भगतसिंग, राजगुरु यांनी आंदोलन केले असते, तर आज त्यांनाही देशद्रोही ठरवले गेले असते,” असे परखड मत अभिजित यांनी व्यक्त केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 126
अभिजीत दीपके आरोप हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

By अनंत पांगारकरJune 16, 20260

​विशेष प्रतिनिधी / मुंबई “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,”…

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.