Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज
धार्मिक

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

रामायणाचा खरा आदर्श हा बंधुभावात दडलेला असून गुरूमिलन, मातृभक्ती, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा हीच रामायणाची खरी शिकवण आहे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
रामराज्य हे केवळ शस्त्राच्या बळावर उभे राहत नसून, त्यासाठी शास्त्र, संस्कार आणि सदाचाराचा भक्कम आधार आवश्यक असतो. तसेच कोणतेही धर्मकार्य यशस्वी करण्यासाठी माणसाकडे दृढ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध रामायणाचार्य ढोक महाराज यांनी केले आहे.
गुंजाळवाडी येथे आयोजित परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सुमारे सात लाख भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घेतला असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे, कथेच्या सांगतेनंतर महाप्रसादासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
अधिक मासातील आठव्या पर्वाचे औचित्य साधून आयोजित या रामकथेच्या अंतिम सत्रात ढोक महाराजांनी आपल्या मधुर आणि ओजस्वी वाणीतून रामायणातील युद्धकांड आणि रामराज्य स्थापनेचे अत्यंत प्रभावी निरूपण केले. रामायणाचा खरा आदर्श हा बंधुभावात दडलेला असून गुरूमिलन, मातृभक्ती, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा हीच रामायणाची खरी शिकवण आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नल-नील यांनी रामनामाच्या सामर्थ्याने केवळ पाच दिवसांत समुद्रावर शंभर योजनांचा सेतू कसा उभारला आणि प्रभू रामांनी ज्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली, तेच आजचे रामेश्वरम कसे बनले, याचा इतिहास त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला.
युद्धकांडाचे विवेचन करताना त्यांनी अंगदशिष्टाई, लक्ष्मण मूर्च्छा, संजीवनी बुटीचे महत्त्व आणि हनुमान-भरत भेट या प्रसंगांचे जिवंत वर्णन केले. प्रभू रामांनी रावणाचा वध करून लंकेचे राज्य बिभीषणाला बहाल केल्याचा प्रसंग सांगताना संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतलेल्या प्रभू रामांचा राज्याभिषेक हा धर्म, न्याय आणि लोककल्याणाचा विजय होता, असे सांगत त्यांनी कथेचा भावपूर्ण समारोप केला.
या सोहळ्याला राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कथा समितीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, उद्योजक आबासाहेब थोरात, संजय पाटणकर, कपिल पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 84
ढोक महाराज स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता; निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश… निसर्ग जपणे हीच गगनगिरी महाराज व ईश्वराची खरी सेवा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 15, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

By अनंत पांगारकरJune 16, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रामराज्य हे केवळ शस्त्राच्या बळावर उभे राहत नसून, त्यासाठी शास्त्र,…

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.