Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता; निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश… निसर्ग जपणे हीच गगनगिरी महाराज व ईश्वराची खरी सेवा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात
धार्मिक

गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता; निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश… निसर्ग जपणे हीच गगनगिरी महाराज व ईश्वराची खरी सेवा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

वारी आणि सप्ताहाच्या माध्यमातून आयोजकांकडून होणारे वृक्षवाटप हा केवळ महाप्रसाद नसून, ती भविष्याची गरज आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
माणूस निसर्गातून जन्माला आला असून त्याला पुन्हा निसर्गातच विलीन व्हायचे आहे, हाच परमपूज्य गगनगिरी महाराजांचा संदेश होता. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण आणि निसर्गाचे जतन करणे हीच गगनगिरी महाराज आणि परमेश्वराची खरी सेवा ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
गुंजाळवाडी (संगमनेर) येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात झालेल्या परमपूज्य विश्वविभूषित स्वामी गगनगिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या सांगता समारंभाप्रसंगी प्रसिद्ध समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले.
या सोहळ्याला व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, राजेंद्र गुंजाळ, हेमंत पवार, महाराजांचे नातेवाईक माने सरकार, पाटणकर सरकार, नवनाथ महाराज आंधळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सन २००२ मध्ये समनापूर येथून गगनगिरी महाराजांच्या या सप्ताहाची परंपरा आपण सुरू केली. त्यानंतर दर तीन वर्षांनी अधिक मासाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यात या भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदा गुंजाळवाडी येथील विस्तीर्ण परिसरात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा भक्तिचा महासागर यशस्वी करण्यासाठी दिलीपराव शिंदे, आबासाहेब थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. सप्ताहामध्ये दररोज सुमारे ७० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तसेच महिलांची लक्षणीय उपस्थिती आणि त्यांचा उत्साह हा या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिस्तबद्ध नियोजन करणे ही ईश्वरी कृपेशिवाय शक्य नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गगनगिरी महाराजांचे संगमनेर तालुक्यावर नेहमीच अथांग प्रेम आणि आशीर्वाद राहिले आहेत, याची आठवण करून देत थोरात यांनी पर्यावरण संवर्धनावर विशेष भर दिला. वारी आणि सप्ताहाच्या माध्यमातून आयोजकांकडून होणारे वृक्षवाटप हा केवळ महाप्रसाद नसून, ती भविष्याची गरज आहे. २००२ मध्ये लावलेली झाडे आज फळे देत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने दिलेले वृक्ष जोपासले पाहिजेत. वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर राजकारण, श्रीमंत-गरीब किंवा लहान-मोठा असा कोणताही भेद नसतो, येथे सर्वजण समान भावनेने हरिनामाच्या गजरात लीन होतात, असेही ते म्हणाले.
चालू वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाचे सावट आणि कमी पावसाची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु, गगनगिरी महाराजांच्या आणि ईश्वराच्या आशीर्वादाने सर्वत्र उत्तम पाऊस पडावा आणि बळीराजासह सर्व नागरिक सुखी, समाधानी व समृद्ध व्हावेत, अशी प्रार्थना बाळासाहेब थोरात यांनी स्वामींच्या चरणी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 559
निवृत्ती महाराज देशमुख बाळासाहेब थोरात स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.