Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान : बाळासाहेब थोरात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून मोठी क्रांती केली आहे. त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर साकारण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.

संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तही त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना डॉ. तांबे यांनी सांगितले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान राहिले असून त्यांनी बहुजन समाजाच्या न्याय-हक्कासाठी संघर्ष केला. अण्णाभाऊंचे समता व मानवतेचे विचार आपल्या राज्यघटनेत समाविष्ट आहेत.

संगमनेर शहरात बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक साकारत असून, त्याच धर्तीवर अण्णाभाऊ साठे यांचेही अद्यावत स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी नगरपालिकेच्यावतीने जागाही निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मातंग एकता आंदोलनाचे अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर राक्षे यांनी अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले, तसेच समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण घेऊन विकासासाठी योगदान देण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमात प्रा. बाबा खरात यांनी अण्णाभाऊ साठे यांची विविध गीते सादर केली. या कार्यक्रमाला नगरसेवक गजेंद्र अभंग, उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रदीप पाटील, नितीन अभंग, संतोष गायकवाड, जीवन पंचारिया यांच्यासह विविध पक्षांचे, पुरोगामी संघटनांचे आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातही अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान : बाळासाहेब थोरात

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या सशक्त लेखणीतून कष्टकरी, श्रमिक आणि वंचितांच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्यांनी ‘फकीरा’ या जगप्रसिद्ध कादंबरीसह ३५ कादंबऱ्या आणि ३०० हून अधिक कथांचे लेखन केले. त्यांचे साहित्य केवळ मराठीपुरते मर्यादित न राहता १४ भारतीय भाषांसह जर्मन, इंग्रजी, पोलिश आणि रशियन यांसारख्या परकीय भाषांमध्येही भाषांतरित झाले आहे. अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार महाराष्ट्रातील तरुणांसाठी सदैव प्रेरणादायी असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 341
अभिवादन बाळासाहेब थोरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुधीर तांबे स्मारक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.