Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक
आंदोलन

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक या विविध प्रमुख ठिकाणी एकाच वेळेस चक्काजाम आंदोलन करण्यात येईल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2026Updated:04/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीचा लढा आता एका निर्णायक वळणावर पोहोचला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगामी ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी भव्य ‘चक्काजाम’ जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या आंदोलनाची घोषणा करताना ही लढाई कोणत्याही एका राजकीय पक्षाची किंवा नेत्याची नसून, ती सामान्य नागरिकांच्या भविष्याची असल्याची ठाम भूमिका मांडली आहे.
सध्या एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी दुसरीकडे जनतेच्या अपेक्षा आणि गरज अद्यापही कायम आहेत. सरकारने कोणत्याही प्रकारचा संकुचित नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. रेल्वेसारखे मोठे प्रकल्प शतकातून एकदाच उभे राहत असतात आणि आज जर ही सुवर्णसंधी हातची गेली, तर आगामी अनेक पिढ्यांना या सुविधेपासून वंचित राहावे लागेल, असे प्रतिपादन आमदार तांबे यांनी केले आहे.
नाशिक आणि पुणे दरम्यानचा प्रवास सध्या दिवसेंदिवस अत्यंत कष्टदायक बनला आहे. पूर्वी कमी वेळात होणाऱ्या या प्रवासासाठी सध्या वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या अपघातांमुळे सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज या मार्गावरून ये-जा करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अत्यंत तीव्र झाली आहे. या रेल्वेमुळे सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर आणि चाकणसह संपूर्ण परिसराला विकासाचा मोठा वेग मिळणार असून दोन्ही प्रमुख शहरांवरील वाहतुकीचा ताणही लक्षणीयरीत्या कमी होईल.
या आंदोलनाची व्याप्ती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक या विविध प्रमुख ठिकाणी एकाच वेळेस चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असणारा सामान्य माणसाचा लढा असल्याने प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे. जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी यापूर्वीही सातत्याने सनदशीर मार्गाने पाठपुरावा करण्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या मार्गाच्या सर्व मंजुऱ्या पूर्ण करून अनेक शेतकऱ्यांना सुमारे ६५० कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले आहे. महामार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडेही वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. आता मात्र केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून क्रांती दिनी रस्त्यावर उतरून न्याय मागण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 747
आंदोलन नाशिक पुणे रेल्वे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.