Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनल्याने प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा लालफितीचा कारभार न करता स्थानिक परिस्थितीनुसार तातडीने निर्णय घ्यावेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/10/2026Updated:15/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनल्याने प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा लालफितीचा कारभार न करता स्थानिक परिस्थितीनुसार तातडीने निर्णय घ्यावेत. पिण्याचे पाणी आणि टँकरची मागणी करणाऱ्यांना अडवणूक न करता मागेल त्याला त्वरित टँकर उपलब्ध करून देण्यात यावेत, असे स्पष्ट आणि कडक निर्देश नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिले.
संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयात आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व शासकीय विभागांची टंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्यासह विविध गावांचे तलाठी, ग्रामसेवक आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक गावातील समस्यांचा सविस्तर आढावा घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यावर विशेष भर देण्यात आला.
आमदार तांबे म्हणाले की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे संगमनेर तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त यादीत झाला आहे. यंदाचा दुष्काळ हा १९७२ च्या दुष्काळापेक्षाही अधिक भयावह आणि अवघड असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. पुढील आठ दिवसांत कोणत्या भागात कोणती कामे तातडीने हाती घेणे आवश्यक आहे, याचा स्पष्ट आराखडा तयार केला जावा. वाड्या-वस्त्यांवरील परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याचे स्रोत टिकवणे आणि जनावरांच्या चारा छावण्यांबाबत ठोस धोरण राबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करावा.
दुष्काळाच्या या काळात शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांनाही रोजगाराची प्रचंड अडचण भेडसावत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर झाली असली तरी शेतमजुरांसाठी ठोस मदत मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्येक गावाने रोजगार हमी योजनेअंतर्गत बंधारे, साखळी बंधारे आणि नाला खोलीकरणाची कामे तातडीने प्रस्तावित करून शेतमजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
याशिवाय महावितरणने सौर कृषिपंपांमधील जाचक त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना तातडीने मंजुरी द्यावी आणि तालुक्यातील ९५ टक्के पूर्ण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना निधी देऊन त्या त्वरित पूर्ण कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. या भीषण दुष्काळी परिस्थितीत गावातील हेवेदावे आणि राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पाणी, वीज आणि चाऱ्याच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना जास्तीत जास्त दिलासा द्यावा, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी शेवटी केले.
यावेळी रामहरी कातोरे, शंकर खेमनर, अविनाश सोनवणे, विलास कवडे, रमेश नेहे, मीराताई शेटे, दत्तात्रय कोकणे, विजय राहणे, अमोल शेलकर, निखिल पापडेजा, अमोल गुंजाळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 96
चारा टंचाई आढावा बैठक पाणी सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.