Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न
धार्मिक

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

पारायण सोहळ्याच्या धर्तीवरच पुढील काळात दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या १००८ पारायण सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचा घोषणा लोळगे यांनी यावेळी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर | प्रतिनिधी:

येथील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात ( दिंडोरी प्रणित) रविवारी ( ता. २६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वामी चरित्र या ग्रंथाचे तब्बल २७ हजार पारायण पार पडले. राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्रातील एकाच दिवसाच्या पारायणाचा हा उच्चांक मानला जातो. 

केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर (काका) लोळगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. आज सकाळी सात वाजल्यापासूनच केंद्राकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारायणासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्यदिव्य मंडपात प्रशस्त बैठक व मोठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळी आठ वाजता एका सेवेकरी जोडप्याच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती होवून पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी नऊ हजार याप्रमाणे एकंदर २७ हजार पारायण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले. या केंद्राला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २५ हजार पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्षात मात्र हा आकडा २७ हजारांपर्यंत गेला.

पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती. वृद्धांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता. शाळकरी मुलेही हिरिरीने सहभागी झाली होती. विशेष म्हणजे तरुण-तरुणींचा पारायण करण्यात तसेच आयोजनाच्या कामातही लक्षणीय सहभाग होता. पारायण सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

स्थानिक नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पारायण सोहळ्याला भेट देवून या आयोजनाबद्दल लोळगे व त्यांच्या सेवेकरी चमुचे कौतुक केले. या पारायण सोहळ्याच्या धर्तीवरच पुढील काळात दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या १००८ पारायण सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचा घोषणा लोळगे यांनी यावेळी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 213
धार्मिक पारायण स्वामी समर्थ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

By Annant Ppangarkar12/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून…

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.