Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका
धार्मिक

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

या धार्मिक सोहळ्यासाठी संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर तालुक्यांतून भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. गगनगिरी महाराज सप्ताह समितीच्या वतीने या भव्य कथेचे नेटके आयोजन करण्यात आले होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर –
सध्याच्या विवाह पद्धतीमध्ये मुहूर्ताकडे होणारे दुर्लक्ष, अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि यामुळे वधूपित्याला सहन करावा लागणारा मानसिक त्रास यावर रामायणाचार्य ढोक महाराज यांनी अत्यंत परखड शब्दांत टीका केली आहे. विवाह सोहळ्यांमध्ये शिस्त राखण्यासाठी गावागावांत युवकांचे ‘दांडके मंडळ’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली.
गुंजाळ मळा येथे आयोजित प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या आठव्या पर्वात ते बोलत होते. या सोहळ्यात ढोक महाराज यांनी आपल्या ओजस्वी, अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी निरूपणातून रामकथेचे विविध पैलू उलगडले. त्यांच्या वाणीतील सात्त्विकता आणि कथनशैलीमुळे संपूर्ण धर्ममंडप भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
गगनगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने उभे राहिलेले हे रामकथा सत्संगाचे मंडप संस्कार, भक्ती आणि अध्यात्माचे विद्यापीठच बनले असल्याचे सांगून ते म्हणाले की, रामानंदाचार्य, गोविंददेवगिरी महाराज, आत्मामलिक श्रीजंगलीसदगुरू महाराज यांच्यासह अनेक संत महात्म्यांच्या दर्शनाने आणि आशीर्वादामुळे हा आध्यात्मिक सोहळा अधिक तेजस्वी आणि चैतन्यमय झाला आहे.
कथेमध्ये ढोक महाराज यांनी परशुराम प्रसंगाचे वर्णन करताना अनेक पिढ्यांचा उल्लेख केला, तसेच भगवान परशुरामांनी राम-लक्ष्मणांच्या तेज, आज्ञापालन व संस्कारांचे केलेले गौरवपूर्ण वर्णन प्रभावी शब्दांत मांडले. कैकयीच्या वरामुळे प्रभू रामांना वनवास भोगावा लागला आणि त्या वियोगाने राजा दशरथांनी अन्नत्याग केला, हा प्रसंग उलगडताना सभागृहातील अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. रामकथेतील चौथा दिवस हा वियोगाचा दिवस असतो, असे सांगत त्यांनी भक्तांना भावविश्वात नेले. शुभ शकुनांचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी नकुल, हरण, पूजा साहित्य घेऊन जाणारी व्यक्ती, कडेवर बाळ घेतलेली स्त्री, डोक्यावर हंडा घेऊन जाणारी महिला, शेतातील कावळे तसेच मासे विकणारा कोळी यांसारख्या उदाहरणांतून शुभ संकेतांचे विश्लेषण केले. अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा प्रसंग वर्णन करताना कोरोना काळात होम हवन करण्याची संधी मिळाल्याने वेदपाठी ब्राह्मण कसे गहिवरून गेले, याचे भावपूर्ण चित्रणही त्यांनी केले.
मुलीच्या पित्याचे महत्त्व अधोरेखित करताना महाराज म्हणाले की, जनकराज्यांच्या चार कन्यांच्या विदाईचा प्रसंग पाहता मुलीचा पिता हा कधीही कमी नसतो, तो खरा दाता असतो आणि कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती यांच्या विदाईचे वर्णन करताना त्यांनी शकुंतला-कण्वमुनी, पार्वती-हिमालय आणि जनकराज यांच्या विरहाची उदाहरणे देऊन प्रत्येक बापाच्या अंतर्मनातील वेदना शब्दबद्ध केल्या. मार्गशीर्ष महिन्यातील गोरज मुहूर्त, शुद्ध पक्ष पंचमी, गायीच्या खुराने उडणारी धूळ यांचे आध्यात्मिक महत्त्व सांगत त्यांनी वेळ आणि मुहूर्ताचे जीवनातील स्थान स्पष्ट केले.
स्व. जयवंतराव गुंजाळ व श्री बाळासाहेब गुंजाळ पाटील यांच्या गुंजाळ मळा येथे आयोजित या सप्ताहात ज्येष्ठ कृष्ण कमला एकादशीच्या निमित्ताने तब्बल ४५ हजार भाविकांनी खिचडीचा महाप्रसाद सेवन केला. या धार्मिक सोहळ्यासाठी संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर तालुक्यांतून भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. गगनगिरी महाराज सप्ताह समितीच्या वतीने या भव्य कथेचे नेटके आयोजन करण्यात आले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 682
ढोक महाराज स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ३…

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.