“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना
दुष्काळामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत असून अशा बिकट परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे
यावेळी नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी नगरपालिकेच्या कामांचा आढावा घेतला. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरात सदैव आनंद, समृद्धी आणि भरभराटीचे वातावरण कायम राहो, अशी प्रार्थना त्यांनी मातेच्या चरणी केली.




