Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

21/10/2026

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह
धार्मिक

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

सर्व रोपे मालपाणी फार्ममध्येच विशेष मेहनतीने तयार करण्यात आली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
“चांगल्याचा स्वीकार करणे आणि वाईटाचा पूर्णपणे त्याग करणे, हाच रावण दहनाचा खरा संदेश आहे,” असे उद्गार मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आणि वृक्षमित्र मनीष मालपाणी यांनी काढले.
विजयादशमीनिमित्त संगमनेर येथील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. यंदाच्या या उत्सवाने आजवरच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढले असून, संपूर्ण परिसर जनसागराने फुलून गेला होता.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन करून मालपाणी उद्योग समूहाच्या प्रांगणातील शमी वृक्षाचे पूजन करण्याची गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. या निमित्ताने संपूर्ण परिसरात करण्यात आलेली आकर्षक रोषणाई आणि पौराणिक व ऐतिहासिक देखाव्यांची सजावट उपस्थितांना प्रत्यक्ष इंद्रलोकाची सफर घडवून आणत होती. या भव्य सोहळ्याची सुरुवात ३६ फूट उंच रावणाच्या प्रतिमेच्या दहनाने झाली.
विशेष अतिथी कलश बियाणेचे समीर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी वर्षा अग्रवाल यांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेच्या हातातील बाणाची वात पेटवून ३६ फुटी रावणाच्या पुतळ्याला अग्नि देण्यात आला. रंगबिरंगी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हजारो नागरिकांनी एकाच वेळी दिलेल्या ‘श्रीरामचंद्राच्या’ जयघोषाने संपूर्ण संगमनेर परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी डॉ. संजय मालपाणी यांनी दशहरा आणि विजयादशमी या शब्दांचा गूढ आणि सहज अर्थ उपस्थितांना समजावून सांगितला. या सोहळ्यात मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या ललिता मालपाणी, सुवर्णा मालपाणी, उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी, जय मालपाणी, यश मालपाणी, हर्ष मालपाणी यांच्यासह संपूर्ण मालपाणी कुटुंब आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विविध सांस्कृतिक आणि थरारक प्रात्यक्षिकांनी झाली. चित्रपटसृष्टीत गाजलेला ‘तात्या विंचू’, गोरिला डान्स, हनुमान डान्स आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील थरारक समूह नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी तृप्ती डोंगरे हिने सादर केलेल्या ‘दुर्गा तांडव स्तोत्रा’ने वातावरण भक्तीमय केले, तर शाळेच्या दहा योगासनपटूंनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना थक्क केले.
नगरसेविका रचना मालपाणी यांच्या संकल्पनेतून गेल्या दशक भरापासून या सोहळ्यात वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला जात आहे. यंदाही या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या तब्बल सात हजार नागरिकांना गुलाब, मोगरा या फुलझाडांसह पेरू आणि आवळ्याच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. ही सर्व रोपे मालपाणी फार्ममध्येच विशेष मेहनतीने तयार करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन मुरारी देशपांडे यांनी केले. व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले होते. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल संगमनेरकरांच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 102
मालपाणी विजयादशमी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

By Annant Ppangarkar21/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- “चांगल्याचा स्वीकार करणे आणि वाईटाचा पूर्णपणे त्याग करणे, हाच रावण दहनाचा…

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

21/10/2026

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/10/2026

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.