Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील
धार्मिक

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

अन्नभेसळ, प्लास्टिक प्रदूषण आणि व्यसनमुक्तीवर संगमनेरमधील व्याख्यानात परखड भाष्य
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत, त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील व्यसनाला आळा घातला पाहिजे, देश जर महासत्ता करायचा असेल, तर आधी गाव आणि शेतकरी समृद्ध करणे गरजेचे असून आपले गाव हेच आपले खरे तीर्थक्षेत्र मानले पाहिजे, असे प्रतिपादन पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
संगमनेर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील शनिवारच्या व्याख्यानात ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात पेरे पाटील यांनी अन्नभेसळ, प्लास्टिक प्रदूषण, बालविवाह, भ्रष्टाचार आणि ग्रामविकास यांसारख्या गंभीर विषयांवर अत्यंत रोखठोक भाषेत विचार मांडले.
सध्या बाहेरच्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून धने, जिरे, हळद, तिखट, जवस तसेच खाद्यतेलांमध्येही भेसळीचे प्रकार वाढले आहेत. या भेसळयुक्त अन्नाचा मानवी आरोग्यावर भयंकर परिणाम होत असल्याने, विशेषतः महिलांनी याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. यासोबतच, प्लास्टिक जाळू नका आणि गावाच्या पर्यावरणासाठी वडाची झाडे लावा, असा सल्ला दिला. वडाचे झाड स्वतःचेच असावे, दुसऱ्याच्या वडाची पूजा करण्यापेक्षा स्वतः झाडे लावून ती जगवावीत, असे ते म्हणाले.
दारूच्या व्यसनामुळे अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. व्यसनमुक्त गाव हेच समृद्ध गाव बनू शकते, त्यामुळे हरिपाठ, सत्संग आणि सातत्यपूर्ण जनजागृतीच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. गावाचा विकास करायचा असेल तर आधी विचार बदलणे गरजेचे आहे.
भ्रष्टाचारापासून दूर राहून प्रामाणिकपणे काम केल्यास समाज त्याची निश्चित दखल घेतो, असे सांगताना त्यांनी पाटोदा गावात राबविलेल्या उपक्रमांचे दाखले दिले. पाटोद्यात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे, निराधारांसाठी मोफत भोजन, मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि दररोज सकाळी राष्ट्रगीत घेण्याचा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
कार्यक्रमात बोलताना त्यांनी अकोले तालुक्यातील अल्पवयीन विवाहांबाबत चिंता व्यक्त केली आणि ग्रामपंचायतींनी या अनिष्ट प्रथेविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. लोकांना लुबाडू नका किंवा त्यांचे रक्त पिऊ नका, असा सल्ला देत तरुणांना उद्देशून त्यांनी, ‘कलेक्टर होता येत नसेल तर कलेक्टरचा बाप व्हा’ असा मार्मिक व दिशादर्शक संदेश दिला.
पती दारू पिऊन आल्यास दार उघडू नका; महिलांना मिश्कील सल्ला
व्यसनमुक्तीमध्ये महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगताना भास्करराव पेरे पाटील यांनी उपस्थितांना आपल्या खास शैलीत एक अजब सल्ला दिला. पती दारू पिऊन घरी आला तर घराचे दार उघडू नका, अशी ठाम भूमिका महिलांनी घ्यावी असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी, ‘महिलांनो, तुम्हीच दारू प्यायला सुरुवात करा, मग पुरुषांना त्याचे दुष्परिणाम समजतील’ अशी मिश्कील टिप्पणी करताच एकच हशा पिकला. त्यांच्या या विधानामध्ये उपरोधाचा भाग असला, तरी दारूच्या व्यसना विरोधात महिलांनी आता अत्यंत आक्रमक आणि ठाम होण्याची गरज आहे, हाच गंभीर संदेश त्यामागे होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 427
भास्करराव पेरे व्याख्यान स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.