Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास विभागाच्या १८०० २३३ ९९९९, ८४२२ ००११३३ किंवा ०२४१-२४७०८६० या क्रमांकांवर संपर्क साधावा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
श्रीरामपूर:
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील भरारी पथक क्रमांक २ ने एका कारवाईत बनावट परदेशी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून पोपट भास्कर पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
श्रीरामपूर येथील आशीर्वाद नगर भागात एका व्यक्तीकडून नामांकित ब्रँडची बनावट दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात ‘इम्पेरियल ब्लू’ आणि ‘रॉयल स्टॅग’ या नामांकित ब्रँड्सच्या व्हिस्कीच्या बनावट असलेल्या एकूण ११७ बाटल्या, एक दुचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ४६ हजार ५९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक प्रमोद सोनोने, अधीक्षक ऋषिकेश इंगळे आणि उपअधीक्षक प्रवीणकुमार तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत निरीक्षक एस. एस. हांडे, दुय्यम निरीक्षक एस. सी. मांडवेकर, पी. आर. गायकवाड आणि पथकातील इतर जवानांनी सहभाग घेतला असून पुढील तपास निरीक्षक एस. एस. हांडे करत आहेत.
दरम्यान, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अवैध हातभट्टी निर्मितीचे केंद्र असलेले गोंधवणी, देवळाली प्रवरा आणि ममदापूर ही ठिकाणे सध्या स्थितीत बंद असल्याचे पथकाला आढळून आले आहे. अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोजे ममदापूर, राजुरी (ता. राहाता) तसेच वारी (ता. कोपरगाव) येथील अवैध हातभट्टी करणाऱ्या व्यक्तींचे, संबंधित गावातील सरपंच व ग्रामस्थ यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व जनतेला आवाहन केले आहे की, मद्य खरेदी करताना ती केवळ परवानाधारक दुकानातूनच करावी. तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास विभागाच्या १८०० २३३ ९९९९, ८४२२ ००११३३ किंवा ०२४१-२४७०८६० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 494
राज्य उत्पादन शुल्क
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.