Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार
धार्मिक

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

आजच्या काळात अनेक संधीसाधू प्रवृत्ती वाढल्या असून बुवा-बाबांचे पेव फुटले आहे. मात्र खरे संत समाजाला योग्य दिशा देणारे असतात.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
अध्यात्मावर बोलणे आणि त्याचा उपदेश करणे सोपे असते, मात्र त्यानुसार जीवन जगणे अत्यंत कठीण आहे. अध्यात्माला बदनाम करू नका. जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसेच मानवाचे जीवन अध्यात्माशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते तथा गगनबावड्याचे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी केले.
स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गगनगिरी महाराजांच्या तपश्चर्या, त्याग, योगसाधना आणि लोककल्याणकारी कार्याचा भावपूर्ण आढावा घेत उपस्थित भाविकांचे प्रबोधन केले.
नंदकुमार पोवार म्हणाले की, गगनगिरी महाराजांच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक आत्मा पावन होतो. कृतज्ञता व्यक्त करताना कधीही कमीपणा वाटून घेऊ नये. महाराजांनी आयुष्यभर ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता कठोर साधना केली. अन्न-पाण्याची तमा न बाळगता त्यांनी आत्मोन्नतीचा मार्ग स्वीकारला. वन्य प्राणी आणि श्वापदांप्रतीही त्यांनी अपार माया दाखवत त्यांचे संगोपन केले.
गगनगिरी महाराज हे जन्मतःच ईश्वरी अवतारातील योगी होते. त्यांनी विविध ठिकाणी कठोर तपश्चर्या करून अध्यात्माचे सामर्थ्य जगासमोर मांडले. दक्षिण भारतातील त्यांची साधना, महालक्ष्मीचे आशीर्वाद आणि ईश्वरप्राप्तीसाठी केलेली अष्टांग योगसाधना यांचा उल्लेख करत पवार यांनी महाराजांच्या अलौकिक जीवनकार्याचा गौरवपूर्ण उहापोह केला.
आजच्या काळात अनेक संधीसाधू प्रवृत्ती वाढल्या असून बुवा-बाबांचे पेव फुटले आहे. मात्र खरे संत समाजाला योग्य दिशा देणारे असतात. गगनगिरी महाराजांनी लोकांमध्ये राहूनही एकांताचा मार्ग स्वीकारत आत्मसाधना केली आणि समाजासाठी आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याचा महिमा अजरामर राहणार असल्याचे पोवार यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यात भक्तीचे बीज रोवून हरिनामाचा जागर घडविण्याचे कार्य गगनगिरी महाराजांच्या कृपेने होत आहे. हा सप्ताह सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजप्रबोधन आणि आध्यात्मिक उन्नतीचा ईश्वरी मेळावा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
व्याख्यानानंतर राधानगरीचे जयवंत महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, तर सायंकाळी हरिपाठाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सप्ताह सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेतला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 260
नंदकुमार पोवार व्याख्यान स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.