Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे : निवृत्त आयएएस अधिकारी इंद्रजीत देशमुख
धार्मिक

आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे : निवृत्त आयएएस अधिकारी इंद्रजीत देशमुख

यश मिळविणे महत्त्वाचे आहेच, पण त्या यशाचा निखळ आनंद घेता आला पाहिजे आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगता आला पाहिजे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या धडपडीत आजचा माणूस स्वतःचे आरोग्य, नातेसंबंध आणि आनंद हरवून बसत आहे. एव्हरेस्टसारखी यशाची उत्तुंग शिखरे सर केली, तरी आयुष्याच्या प्रवासात माणूस एकटा राहता कामा नये. यशाबरोबरच माणसाला आपल्या आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त आयएएस अधिकारी व नाम फाऊंडेशनचे व्याख्याते इंद्रजीत देशमुख (काका) यांनी येथे केले.
पूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पाटणकर यांच्या हस्ते इंद्रजीत देशमुख यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना देशमुख यांनी ईश्वरनिष्ठ संतांच्या मांदियाळीत या सप्ताहाची सुरुवात होत असल्याचे सांगत संत परंपरेचे समाजजीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.
मानवी जीवनातील चार आश्रम व्यवस्थेचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की, पूर्वीचा माणूस निसर्गाशी सुसंगत जीवन जगत असल्याने दीर्घायुषी होता. त्यामुळे निसर्गाने निर्माण केलेल्या व्यवस्थेचा आदर करून जीवन जगणे आज आवश्यक बनले आहे. मानवाच्या अंगी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता दडलेल्या असून त्या ओळखून विकसित करण्याची गरज आहे. आज आपण भौतिकदृष्ट्या समृद्ध झालो असलो, तरीही आपण मिळवलेली शक्ती, ज्ञान आणि संस्कार पुढील पिढीकडे यशस्वीपणे हस्तांतरित करणे हेच आपले खरे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
संतांनी समाजात चांगुलपणा रुजावा आणि मानवी मूल्यांची जपणूक व्हावी म्हणून सप्ताह, पारायण आणि कीर्तनाची सुंदर परंपरा निर्माण केली आहे. पारायणामुळे मनुष्य अंतर्बाह्य पवित्र होतो, तर ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलींचा ज्ञानस्पर्श आहे. संत मंडळींनी समाजाला नेहमीच ज्ञानरूपी यज्ञाकडे नेण्याचे पवित्र काम केले असून, संत हे संसाराला शीतल सावली देणारे वटवृक्ष आहेत, अशा शब्दांत त्यांनी संत साहित्याचा गौरव केला.
उत्तम आरोग्य हा माणसाचा सर्वात मौल्यवान दागिना आहे. संसारात धन हे नेहमी शुद्ध मार्गाने आणि उत्तम व्यवहाराने मिळविलेले असावे, घरात अवदसा नसावी, पत्नी प्रेमळ व गोड बोलणारी असावी, पुत्र आज्ञाधारक व कर्तृत्ववान असावा आणि वडीलही त्या योग्यतेचे असावेत. तसेच आपण ज्या क्षेत्रात कार्य करतो, त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान असणे अत्यंत अत्यावश्यक आहे.
आजचा माणूस पैसा, लौकिक, आनंद आणि सुखाच्या शोधात अखंड धावत असताना स्वतःच्या शरीरस्वास्थ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा महत्त्वपूर्ण दाखला दिला. यश मिळविणे महत्त्वाचे आहेच, पण त्या यशाचा निखळ आनंद घेता आला पाहिजे आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगता आला पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. या व्याख्यानाला संगमनेर परिसरातील ग्रामस्थ, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 383
इंद्रजीत देशमुख व्याख्यान स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

July 23, 2026

संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन

July 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.