Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण
धार्मिक

अहिल्यानगरमध्ये रविवारी रंगणार ऐतिहासिक सोहळा; बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

बालसंस्कार विभागासह केंद्रातील सर्व १८ विभागांच्या माध्यमातून येथे आदर्श समाज घडवण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/07/2026Updated:23/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी):

अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने रविवारी, (२६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत भव्य आणि ऐतिहासिक सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल २५ हजार भाविकांच्या एकत्र येण्यातून हा अभूतपूर्व आध्यात्मिक सोहळा साकारणार असून, परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या विशेष पुढाकारातून आणि मार्गदर्शनातून या अभिनव उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून अविरत कार्यरत असलेल्या या केंद्राचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. सुरुवातीच्या काळात परिसरातील विरळ वस्तीमुळे भाविकांची संख्या मर्यादित होती, परंतु काळाच्या ओघात या केंद्राने अध्यात्म आणि समाजकारणाची उत्तम सांगड घातली. विशेषतः व्यसनाधीनता आणि नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुण पिढीला स्वामींच्या विचारांनी नवसंजीवनी दिली. अत्यंत खडतर परिस्थितीत आणि आर्थिक चणचणीतही तरुणांनी चुकीचा मार्ग न निवडता अध्यात्माचा आधार घेतला, ज्याच्या जोरावर आज अनेक तरुण उद्योग, व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात यशस्वीपणे स्थिरस्थावर झाले आहेत.

केवळ आध्यात्मिक केंद्र न राहता, बालसंस्कार विभागासह केंद्रातील सर्व १८ विभागांच्या माध्यमातून येथे आदर्श समाज घडवण्याचे कार्य अविरत सुरू आहे. यामुळेच आज या केंद्रात सर्व स्तरांतील भाविकांचा राबता पाहायला मिळतो. नागरी वस्तीच्या विस्तारामुळे आता अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यातूनही भक्तगण येथे मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. गुरुवार आणि रविवारी तर येथे भक्तांची अलोट गर्दी उसळलेली असते. अनेक भक्तांना स्वामींच्या सेवेतून प्रचिती मिळाली असून, भरकटलेल्या आयुष्याला योग्य दिशा मिळाल्याचे समाधान सेवेकरी व्यक्त करत आहेत.

या पावन आणि मंगलमय पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या २५ हजार स्वामी चरित्र पारायण सोहळ्यात बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वामी सेवेचा आणि आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 245
स्वामी चरित्र पारायण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन…

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.