Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन

July 5, 2026

संगमनेरात १२ जुलै रोजी राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन; नोंदणी सुरू

July 5, 2026

रविवार विशेष लेख — लातोंके भूत बातोंसे नही मानते…!

July 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन
धार्मिक

संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिका तैनात करण्यात आल्या आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
रिमझिम पावसाच्या धारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि विठूनामाच्या जयघोषात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसह आगमन झाले. यावेळी वारकरी संप्रदायाचे पाईक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे भक्तीभावाने स्वागत करून दर्शन व पूजन केले.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. जयश्रीताई थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि दिंडीचे माधव महाराज राठी उपस्थित होते.
लेझिम पथके, पारंपरिक वाद्ये, विद्यार्थ्यांनी केलेली पारंपरिक वेशभूषा आणि स्वागताच्या कमानींनी सजलेल्या परिसरात सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी पालखीचे जोरदार स्वागत केले. यावेळी वारकरी बांधवांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर अभंग गात आणि फुगड्या खेळत संपूर्ण परिसर विठ्ठलमय करून टाकला होता. डॉ. जयश्रीताई थोरात यांनीही वारकरी महिलांसोबत अभंग गायनाचा आनंद घेतला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून वारकरी संप्रदाय जात-पात आणि धर्म विसरून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा समतेचा संदेश देतो. शांतता, समानता आणि सद्भावनेचे प्रतीक असलेली ही वारी जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, यासाठी परदेशातूनही भाविक येत असतात. सध्या राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने संपूर्ण देश आणि राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी, नागरिक सुखी-समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या स्वागताच्या परंपरेचा गौरव करत चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली. वारीत कधीही भेदभाव नसतो या वारीतून समतेचा संदेश दिला जातो असे सांगितले. तर डॉ. जयश्रीताई थोरात यांनी वारी ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असल्याचे सांगत मागीलवर्षी संगमनेरमधील १ हजार युवकांनी यात सहभाग घेतल्याची आठवण करून दिली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर, चहा, नाश्ता आणि राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिका तैनात करण्यात आल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये पालखीचे स्वागत केले जात असून, वारकऱ्यांनी या उत्तम सुविधांबद्दल अमृत उद्योग समूह आणि थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 222
बाळासाहेब थोरात संत निवृत्तीनाथ महाराज पालखी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पेमगिरीत वटपौर्णिमा उत्सवात दोन हजार फळझाडांचे वाटप; महिला सन्मानासह दिला पर्यावरणाचा संदेश

June 29, 2026

कोळवाडे येथे बुधवारी भव्य आदिवासी मेळावा

June 29, 2026

माजी मंत्री थोरात म्हणाले… हे तर पेपरफुटी सरकार!

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन

By अनंत पांगारकरJuly 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रिमझिम पावसाच्या धारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि विठूनामाच्या जयघोषात शेकडो…

संगमनेरात १२ जुलै रोजी राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन; नोंदणी सुरू

July 5, 2026

रविवार विशेष लेख — लातोंके भूत बातोंसे नही मानते…!

July 5, 2026

आज रविवार, ०५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.