Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात १२ जुलै रोजी राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन; नोंदणी सुरू
सामाजिक

संगमनेरात १२ जुलै रोजी राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन; नोंदणी सुरू

या संमेलनाला संपूर्ण राज्यभरातून विवाहयोग्य युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांचा दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन रविवारी (दिनांक १२ जुलै) संगमनेर-लोणी रोडवरील गणपती मंदिराजवळील वसंत लॉन्स येथे होणार असल्याची माहिती पत्रकार गौतम गायकवाड यांनी दिली.
सन २०११ पासून प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींसाठी या सामाजिक उपक्रमाचे सातत्याने व विनामूल्य आयोजन करण्यात येत आहे. डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाला समाजातील सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आला आहे.
यापूर्वी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कालकथित प्रेमानंद रूपवते, कालकथित स्नेहाजाताई रुपवते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकरराव सोनवणे, प्रा. एस. झेड. देशमुख, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, लिज्जत पापडचे महाव्यवस्थापक सुरेशराव कोते, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, कैलास सोमाणी आणि डॉ. गौतमी सोनवणे यांसह अनेक मान्यवरांनी या सेवाभावी उपक्रमाला प्रत्यक्ष भेटी देऊन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
या संमेलनाला संपूर्ण राज्यभरातून विवाहयोग्य युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांचा दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. या व्यासपीठाच्या माध्यमातून आजवर अनेक युवक-युवतींचे तसेच घटस्फोटीत वधू-वरांचेही विवाह यशस्वीपणे जुळून आले आहेत. या आगामी संमेलनात सहभागी होण्यासाठी विवाहयोग्य वधू-वरांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी इच्छुकांनी यश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, शासकीय विश्रामगृह, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे संपर्क साधावा. पूर्णपणे मोफत असलेल्या या सामाजिक उपक्रमात समाजबांधवांनी व पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक के. एस. गायकवाड, ए. पी. बनसोडे, विनोद गायकवाड आणि डि. के. जमधडे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 489
डी. एस. गायकवाड प्रतिष्ठान राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.