Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

5G च्या युगातही कुंभारवाडी नेटवर्कविना! अखेर केंद्र सरकारची मंजुरी; सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

13/11/2026

इटलीच्या मातीत जन्मलेली, भारताच्या मातीशी नाते जोडणारी कहाणी! ‘Belonging: A Journey of Love’ – सोनिया गांधी यांच्या आयुष्याचा उलगडा करणारे आत्मकथन

13/11/2026

लोकसेवा फाउंडेशनचा ‘वृद्धाश्रमात दिवाळी’ उपक्रम उत्साहात संपन्न!

13/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकसेवा फाउंडेशनचा ‘वृद्धाश्रमात दिवाळी’ उपक्रम उत्साहात संपन्न!
सामाजिक

लोकसेवा फाउंडेशनचा ‘वृद्धाश्रमात दिवाळी’ उपक्रम उत्साहात संपन्न!

राजूरमधील देशमुख वृद्धाश्रमात लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने 'वृद्धाश्रमात दिवाळी' उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना फराळ, पुस्तके आणि भेटवस्तू वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आप्तस्वकीयांसोबत स्नेहाचे क्षण अनुभवण्याचा सण. मात्र, परिस्थितीमुळे वृद्धाश्रमात आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा आजी-आजोबांच्या आयुष्यात आपुलकीचे आणि मायेचे क्षण निर्माण करण्याच्या सामाजिक भावनेतून लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने राजूर-भंडारदरा रोडवरील कै. नानासाहेब देशमुख वृद्धाश्रमात ‘वृद्धाश्रमात दिवाळी’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ, विविध भेटवस्तू, दिवाळी विशेषांक तसेच वाचनासाठी पुस्तके भेट देण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकले. दिवाळीच्या आनंदात त्यांना सहभागी करून घेण्याचा हा प्रयत्न उपस्थितांसाठी एक संवेदनशील आणि माणुसकीचा अनुभव देणारा ठरला.
दरवर्षी हा उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ॲड. एम. एन. देशमुख साहेब तसेच राजहंस ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक नंदकिशोर बेल्हेकर सर यांचे लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रथमेश बेल्हेकर यांनी आभार मानले. समाजातील गरजू आणि वंचित घटकांसोबत सण-उत्सव साजरे करण्याच्या उद्देशाने फाउंडेशन सातत्याने हा उपक्रम राबवत असून यंदाचे हे सातवे वर्ष असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रसंगी श्रेयस करपे, संकेत घोडेकर आणि संभव लोढा उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विवेक कोथमिरे, प्रीतेश नवले, अनिल केदारी, संकेत काकडे, दर्शन गायकवाड, ब्रह्मा खिडके आणि अक्षय नेवासकर यांनी विशेष योगदान दिले. तसेच दैनिक युवावार्ताचे संपादक किसनभाऊ हासे, ज्येष्ठ पत्रकार संतोष खेडलेकर, दिव्य मराठीचे गौतम गायकवाड आणि लोकमतचे शेखर पानसरे यांनी दिवाळी अंक व पुस्तके भेट दिली. नगरसेवक सोमेश्वर दिवटे, गौरव डोंगरे, विकीशेठ वर्मा व तुषार भगत यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी भेटवस्तू देण्यात आल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 235
कै. नानासाहेब देशमुख वृद्धाश्रम प्रथमेश बेल्हेकर लोकसेवा फाउंडेशन वृद्धाश्रमात दिवाळी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजापूरमध्ये माणुसकीची दिवाळी: राहुल गांधी समर्थक संघाकडून स्व. विकास हासे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात

09/11/2026

स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती

04/11/2026

संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

03/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

5G च्या युगातही कुंभारवाडी नेटवर्कविना! अखेर केंद्र सरकारची मंजुरी; सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar13/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- जग 5G तंत्रज्ञानाच्या पुढे जात सॅटेलाइट इंटरनेटच्या नव्या पर्वात प्रवेश करत…

इटलीच्या मातीत जन्मलेली, भारताच्या मातीशी नाते जोडणारी कहाणी! ‘Belonging: A Journey of Love’ – सोनिया गांधी यांच्या आयुष्याचा उलगडा करणारे आत्मकथन

13/11/2026

लोकसेवा फाउंडेशनचा ‘वृद्धाश्रमात दिवाळी’ उपक्रम उत्साहात संपन्न!

13/11/2026

शुक्रवार १३ नोव्हेंबर २०२६ —- आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या राशिभविष्य

13/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.