Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल
प्रशासन

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

पाच सक्षम प्राधिकरणांचे आदेश असतानाही कारवाई टाळली जात असल्याने प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:
तहसील, प्रांत, दिवाणी व जिल्हा न्यायालय आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजय मिळवूनही मंगळापूर येथील शेतकऱ्यांना अजूनही सामाईक रस्ता मिळालेला नाही. सक्षम प्राधिकरणांचा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागूनही संगमनेर तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयाचे आदेश मोठे की तहसीलदार, असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील सर्व्हे नंबर ७८ मधील सामाईक रस्त्यावर काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून तो अडवला आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून मशागत, पिकांची व अवजारांची वाहतूक करणे अशक्य झाले आहे. याविरोधात आप्पा पवार, सिताराम पवार, सूर्यभान पवार, बाळकृष्ण पवार, रावसाहेब पवार, भाऊसाहेब पवार आणि अशोक पवार यांनी प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला.
या प्रकरणी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी तहसील कार्यालय, २७ जून २०२४ रोजी प्रांत कार्यालय, १० जानेवारी २०२५ रोजी दिवाणी न्यायालय, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा न्यायालय आणि अखेर १३ जुलै २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. उच्च न्यायालयाने महसूल प्रशासनाच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तो पूर्ववत खुला करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय असूनही प्रत्यक्ष कारवाई शून्य असल्याने बाधित शेतकऱ्यांनी २१ जुलै २०२६ रोजी संगमनेर तहसील कार्यालयात पुन्हा अर्ज दाखल केला आहे. महसूल अधिकारी, मोजणी पथक व पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देऊन तात्काळ अतिक्रमण हटवण्याची मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली आहे. पाच सक्षम प्राधिकरणांचे आदेश असतानाही कारवाई टाळली जात असल्याने प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाने तातडीने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून रस्ता खुला न केल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 817
टाळाटाळ तहसीलदार रस्ता
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

By Annant Ppangarkar12/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून…

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.