Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

सर्व नियमबाह्य नियुक्त्या रद्द करून संबंधित कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

विशेष प्रतिनिधी / मुंबई:

मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि गोपनीयता अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. विविध मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये उसनवारीवर किंवा केवळ मौखिक आदेशाच्या आधारे नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत. अशा सर्व कर्मचाऱ्यांना येत्या १० सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांच्या मूळ जागी परत पाठवण्याची कारवाई पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, नियमबाह्य पद्धतीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.

राज्यातील अनेक मंत्र्यांनी प्रशासकीय प्रक्रियेला बगल देत आपल्या सोयीनुसार इतर कार्यालयांतून अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या कार्यालयात रुजू करून घेतले आहेत. नियमानुसार मंत्र्यांकडे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची उपलब्धता करणे, प्रतिनियुक्ती देणे किंवा कंत्राटी नियुक्ती करण्यासाठी एक विशिष्ट कार्यपद्धत आखून दिलेली आहे. यासाठी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभाग, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणे बंधनकारक असते. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात या मान्यतेशिवायच केवळ तोंडी आदेशावरून किंवा थेट उसनवारीवर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात असल्याचे उघडकीस आले होते.

अशा प्रकारे तोंडी आदेशाने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना मंत्रालयीन कामाचा आवश्यक अनुभव आणि प्रशिक्षण नसल्यामुळे एकूणच प्रशासकीय कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होतो. मंत्रालयातील कामकाज अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र, गोपनीय अहवाल, विभागीय चौकशी आणि इतर सेवाविषयक बाबींची कसून पडताळणी होणे आवश्यक असते. उसनवारीने केलेल्या तात्पुरत्या नियुक्तीमध्ये यातील कोणत्याही बाबीची पडताळणी होत नसल्याचे मुख्य सचिवांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर, सर्व नियमबाह्य नियुक्त्या रद्द करून संबंधित कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे कर्मचारी मूळ विभागात हजर झाल्याचा अहवाल १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रालयीन विभागाकडे सादर करावा लागणार आहे. दिलेल्या मुदतीत जे अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या मूळ विभागात रुजू होणार नाहीत, त्यांचे वेतन तात्काळ बंद केले जाईल. तसेच या संपूर्ण कारवाईचा सविस्तर अहवाल २० सप्टेंबर २०२६ पर्यंत अप्पर मुख्य सचिव व प्रधान सचिवांनी मुख्य सचिवांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 881
मुख्यमंत्री
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.