Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!
प्रशासन

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना या प्रवेशबंदीतून सूट देण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

अहिल्यानगर:

अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने १५ आणि १६ ऑगस्ट रोजी अकोले तालुक्यातील भंडारदरा व परिसरातील पर्यटन स्थळांवर होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रंधा फाटा ते भंडारदरा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. 

स्वातंत्र्यदिन आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार व रविवारी पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे आणि अहिल्यानगर येथून मोठ्या संख्येने पर्यटक भंडारदरा, रंधा धबधबा, कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड व कोकण कडा परिसरात येण्याची शक्यता आहे. या परिसरातील रस्ते अरुंद असून काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) नुसार हे वाहतूक नियमनाचे आदेश जारी केले आहेत.

नवीन नियमांनुसार रंधा फाटा येथून भंडारदरा कडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. शेंडी व भंडारदरा येथे जाण्यासाठी पर्यटकांना वाकी फाटा व वारंगुशी फाटा येथून प्रवेश दिला जाईल. याशिवाय पर्यटकांच्या प्रवासासाठी एकेरी वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आला असून वाहने वारंगुशी फाटा किंवा वाकी फाटा येथून प्रवेश करून चिंचोंडी फाटा, यश रिसॉर्ट, शेंडी, भंडारदरा धरण स्पिलवे गेट, भंडारदरा गाव, गुहिरे मार्गे रंधा या रस्त्याने पुढे जातील.

हे वाहतुकीतील बदल १५ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागू राहतील. शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना या प्रवेशबंदीतून सूट देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,024
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना…

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.