Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी
व्याख्यान

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

राजस्थान युवक मंडळाच्या व्याख्यानमालेत ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाचे रसाळ निरुपण; संगमनेरकर भाविक भक्तिरसात चिंब
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ किंवा जबाबदारीची पूर्तता नसून, आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक काम परमेश्वराला अर्पण करण्याची वृत्ती म्हणजे कर्मयोग आहे. कर्माच्या फळाची आसक्ती न ठेवता प्रत्येक कृतीतून अंतःकरणातील ईश्वराशी संवाद साधणे, हाच संत ज्ञानेश्वर माउलींच्या ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाचा खरा गाभा आहे, असे प्रतिपादन गीता विशारद् डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

राजस्थान युवक मंडळाच्या वतीने आयोजित मनःशांती आणि जीवनविकास व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात डॉ. मालपाणी ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या व चौथ्या अध्यायाचे निरुपण करत होते.

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ या विषयावर बोलताना त्यांनी कर्मापासून पळून जाण्याऐवजी कर्मातच साधना शोधण्याचा ज्ञानेश्वरीचा मार्ग उपस्थितांसमोर स्पष्ट केला. माणसाच्या आयुष्यात श्वास असेपर्यंत कर्म अटळ आहे, त्यामुळे कर्म सोडून देणे म्हणजे संन्यास नव्हे. उलट, आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने पार पाडणे हाच खरा संन्यास आहे, अशी मांडणी त्यांनी केली.

आपल्या निरुपणादरम्यान त्यांनी विविध प्रातिनिधिक प्रार्थनांच्या माध्यमातून अंतःकरणाची शुद्धता आणि बाह्य कर्माची सांगड घालून दिली. घर, व्यवसाय, समाज आणि नाती सांभाळत असताना अंतःकरणात ईश्वराची जाणीव ठेवून केलेले कोणतेही सामान्य काम कर्मयोगात रुपांतरित होते, हा सूक्ष्म विचार त्यांनी संगमनेरकरांच्या मनःपटलावर बिंबवला.

या व्याख्यानाला लाभलेल्या संगीताच्या सुरेल साथीमुळे संपूर्ण वातावरण अत्यंत भक्तिमय झाले होते. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा भाव आणि संगीताचे माधुर्य यांच्या मिलाफामुळे श्रोते भावविश्वात रंगून गेले.

संगमनेरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात राजस्थान युवक मंडळाची ही व्याख्यानमाला दरवर्षी श्रावणमासात एक वैचारिक पर्वणी ठरते. यंदाच्या सोहळ्याची सुरुवात कीर्तनचंद्रीका रोहिणी परांजपे यांच्या कीर्तनाने झाली असून, डॉ. संजय मालपाणी यांच्या दोन दिवसीय निरुपणाने या त्रिवेणी संगमाची उंची आणखी वाढवली आहे.

या कार्यक्रमास राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सागर मणियार, उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, शुभम राठी, दर्शन भंडारी, ओम इंदाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे सचिव कृष्णा आसावा यांनी वक्त्यांचा परिचय करून देत सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 303
मनःशांती आणि जीवनविकास व्याख्यानमाला व्याख्यान व्याख्यानमाला संजय मालपाणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.