Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सातपुते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर :
संगमनेर शहरातील सह्याद्री कॉलेज शेजारी, ऑरेंज कॉर्नर परिसरात असलेल्या ‘बर्गेज कॅफे’मध्ये कॉलेजच्या मुला-मुलींना जास्तीचे पैसे घेऊन अश्लील चाळे करण्यासाठी बेकायदेशीरपणे जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलिसांनी सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळी पावणेअकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास या कॅफेवर बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि पथकाने दोन सरकारी पंचांच्या समक्ष नियोजन केले. एका पंचाला बनावट ग्राहक बनवून एक हजार रुपयांची रोख रक्कम देऊन बर्गेज कॅफेमध्ये स्वतंत्र रूमच्या बुकिंगसाठी पाठवण्यात आले. कॅफे चालकाने वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि स्वतंत्र बसण्यासाठी रूम उपलब्ध करून दिल्याची खात्री पटताच, बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा दिला.
त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बर्गेज कॅफेवर छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी कॅफेची झाडाझडती घेतली असता, तेथे टेबल, खुर्ची आणि सोफे असलेला एक छोटा स्वतंत्र रूम आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून कॅफे चालक अनुज अशोक नाकील (वय २१ वर्षे, रा. गल्ली क्र. १, जनता नगर (पूर्व), संगमनेर) याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे.
आरोपी अनुज नाकील याच्याकडे जिल्हाधिकारी अहिल्यानगर व संगमनेर नगरपालिकेकडून ‘बर्गेज कॅफे’ या नावाने केवळ चहा, कॉफी, नाष्टा व इतर खाद्यपदार्थांची विक्री करण्याचा परवाना होता. मात्र या परवान्याच्या अटींचा भंग करून विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुला-मुलींना जास्तीचे पैसे घेऊन अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस अंमलदार सागर मच्छिंद्र नागरे यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी अनुज नाकील याच्याविरुद्ध गु.र.नं. ८१२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, २९६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सातपुते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,100
अनैतिक धंदे अश्लील जाळे कॅफे पोलीस कारवाई शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

पत्रकारावर हल्ला करून फरार झालेले तीन आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे परिसरातील नागरिकांच्या…

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

26/08/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.