Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!
व्याख्यान

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

नागरिकांनी चारही दिवस सहकुटुंब उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

श्रावण मासाचे औचित्य साधून संगमनेर येथे राजस्थान युवक मंडळाच्या वतीने मालपाणी लॉन्स येथील उत्सव सभागृहात २२ ते २५ ऑगस्टदरम्यान चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी आणि कार्याध्यक्ष सागर मणियार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या व्याख्यानमालेच्या पहिल्या टप्प्यात, म्हणजेच शनिवार २२ आणि रविवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९.०० या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार आणि समाजप्रबोधनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे सुमधुर प्रवचन होणार आहे.

त्यानंतर सोमवार २४ आणि मंगळवार २५ ऑगस्ट रोजी प्रख्यात प्रेरक व्याख्याते आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायाचे आपल्या रसाळ शैलीत निरुपण करणार आहेत. मागील वर्षी श्रावण महिन्यात त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी भावयात्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात पहिल्या व दुसऱ्या अध्यायावर आधारित भावार्थ सादर करण्यात आला होता, ज्याला हजारो श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

सभागृहात श्रोत्यांसाठी खुर्च्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. नागरिकांनी चारही दिवस सहकुटुंब उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, सचिव कृष्णा आसावा, खजिनदार वेणुगोपाल कलंत्री, सहसचिव दर्शन भंडारी, सहखजिनदार सीए शुभम राठी हे प्रमुख पदाधिकारी सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. तसेच, कार्यकारिणी सदस्य गिरीश मालपाणी, मधुसूदन नावंदर, राजकुमार बिहाणी, मनीष मणियार, नितीन लाहोटी, आशिष राठी, सुमित अट्टल, गौरव राठी, सचिन पलोड, प्रतीक पोफळे, ओंकार इंदाणी, पवन करवा, उमेश कासट, कल्याण कासट, गणेश लाहोटी, रोहित मणियार, सम्राट भंडारी, व्यंकटेश लाहोटी, प्रथम खटोड, सिद्धांत झंवर आणि शुभम आसावा हे सर्व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 403
राजस्थान युवक मंडळ व्याख्यानमाला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.