Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
अपघात

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

घटनेनंतर त्यांना तात्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

एका दुःखद प्रसंगासाठी एकत्र आलेल्या नातेवाईकांवर नियतीने आणखी एक भीषण आघात केला आहे. नातेवाईकाच्या दशक्रिया विधीच्या मदतीसाठी आलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा विद्युत तारेचा तीव्र धक्का लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. धांदरफळ बुद्रुक येथे मंगळवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे धांदरफळ आणि प्रवरानगर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

ललिता सुनील थेटे (वय ६०, रा. भगवतीपूर, प्रवरानगर) असे या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या महिलेचे नाव आहे. धांदरफळ बुद्रुक येथील तोरकडी कुटुंबातील नातेवाईकाच्या दशक्रिया विधीनिमित्त त्या तीन-चार दिवसांपूर्वीच मदतीसाठी आल्या होत्या. बुधवारी पार पडणाऱ्या विधीच्या आदल्या दिवशी सर्व पाहुणे-रावळे एकत्र जमले होते. दिवसभर घरकामात हातभार लावल्यानंतर रात्रीच्या वेळी सर्वजण गप्पा मारत बसले होते. दरम्यान, कांद्याच्या चाळीत कुत्रे किंवा मांजरी जाऊ नयेत म्हणून ललिता थेटे या शेजारी असलेल्या चाळीचा लोखंडी दरवाजा लावण्यासाठी गेल्या.

दरवाजा लावताना बाजूला असलेली विद्युत तार लोखंडी कुंपणाच्या संपर्कात आलेली होती. तसेच त्या ठिकाणी ओलावा असल्याने दरवाजाला हात लावताच ललिता यांना विजेचा अतिशय तीव्र धक्का बसला. हा झटका इतका भीषण होता की अवघ्या काही मिनिटांतच त्या जागीच गतप्राण झाल्या. काही फुटांवरच ही घटना घडल्याने नातेवाईकांनी तात्काळ तिकडे धाव घेतली. सुरुवातीला त्यांना साप चावल्याचा संशय आला, मात्र प्रसंगावधान राखून लाकडाच्या साहाय्याने त्यांना विद्युत प्रवाहापासून बाजूला करण्यात आले.

घटनेनंतर त्यांना तात्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. एका दुःखद प्रसंगाला सावरण्यासाठी आलेल्या कुटुंबावर ललिता यांच्या रूपाने पुन्हा दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 443
दुर्दैवी महिलेचा मृत्यू विजेचा धक्का
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026

दिंडीच्या ट्रकने धडक दिल्याने तीन वारकरी महिलांचा मृत्यू तर चौघी जखमी

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: एका दुःखद प्रसंगासाठी एकत्र आलेल्या नातेवाईकांवर नियतीने आणखी एक भीषण…

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.