Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

15/11/2026

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चंदनापुरी घाटात मोठा अपघात; ब्रेक फेल झाल्याने एकामागून एक १०-१२ वाहने धडकली, मात्र टळली मोठी जीवितहानी
अपघात

चंदनापुरी घाटात मोठा अपघात; ब्रेक फेल झाल्याने एकामागून एक १०-१२ वाहने धडकली, मात्र टळली मोठी जीवितहानी

घाटात ऐन गर्दीच्या वेळी १० ते १२ वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे मोठा अनर्थ ओढवला असता, परंतु सुदैवाने सर्व गाड्यांमधील प्रवासी व चालक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आनंदवाडी शिवारात शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी उसाच्या ट्रॅक्टर आणि डंपरच्या अपघातानंतर झालेल्या वाहतूक कोंडीत नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात घडला. पुण्याकडून येणाऱ्या मालट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोर उभ्या असलेल्या एसटी बससह तब्बल १० ते १२ वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली, तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चंदनापुरी घाटातील लेनवर एका उसाचा ट्रॅक्टर व डंपरमध्ये किरकोळ अपघात झाला होता. या अपघातामुळे घाटामध्ये अचानक वाहतूक जाम झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. याचदरम्यान पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणारा मालट्रक (क्रमांक एमएच ३४ बीजी ३३८६) चे अचानक ब्रेक फेल झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अनियंत्रित मालट्रक समोर उभ्या असलेल्या एसटी बसवर (क्रमांक एमएच १४ एचएम ७३७५) जाऊन धडकला.

या तीव्र धडकेमुळे एसटी बस समोरील इतर वाहनांवर आदळली. तसेच मालट्रक बाजूने जात असलेल्या इनोव्हा कारला (क्रमांक एमएच १२ एलडी २६०८) देखील जोरदार धडकल्याने ती कार दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकून चक्काचूर झाली. याशिवाय वॅग्नर कार (क्रमांक एमएच १५ एचसी ९०४३) आणि महिंद्रा कार (क्रमांक एमएच १२ एसयू २२९६) यांच्यासह एकूण १० ते १२ वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठा गोंधळ उडाला.

अपघाताची माहिती मिळताच डोळासणे मदत व पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक बांबळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेरमाळे, पोलीस कॉन्स्टेबल काकड, सदगिर व राहाणे यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टोलनाक्याच्या क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. या मालिकेतील अपघातामुळे चंदनापुरी घाट पूर्णपणे जाम झाला होता. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याची प्रक्रिया सुरू केली.

घाटात ऐन गर्दीच्या वेळी १० ते १२ वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे मोठा अनर्थ ओढवला असता, परंतु सुदैवाने सर्व गाड्यांमधील प्रवासी व चालक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,053
अपघात चंदनापुरी घाट नाशिक पुणे महामार्ग महामार्ग पोलीस वाहतूक ठप्प विचित्र अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

By Annant Ppangarkar15/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शैक्षणिक गुणवत्ता, नवसंशोधन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या…

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026

सकाळीच महिला शिक्षिकेच्या गळ्यातून दीड तोळ्याची मिनी गंठण लांबवून चोरटे पसार; संगमनेरात या रस्त्यावरील घटना

15/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.