Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर
अपघात

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

राहाता पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पेटारे या घटनेचा पुढील सखोल तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर/राहाता:

रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या एका भरधाव फॉर्च्युनर कारने दिलेल्या भीषण धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जीवनाशी झुंज देत आहे. 

हा थरारक अपघात १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी को-हाळे शिवारातील उपाध्ये वस्तीजवळ घडला. या घटनेनंतर जखमींना मदत न करता थेट काढता पाय घेतल्याने संगमनेर येथील नामांकित डॉ. सत्यजित निघुते यांच्यावर राहाता पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कचऱ्याचे साहित्य घेऊन संगमनेरच्या दिशेने जाणारा टाटा ७०९ टेम्पो बंद पडल्यामुळे चालकाने तो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. टेम्पो दुरुस्तीचे काम सुरू असतानाच समोरच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने आलेल्या फॉर्च्युनर कारने टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की त्यात सज्जाद कमालउद्दीन या २३ वर्षीय उत्तर प्रदेशातील तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर संगमनेर येथील युनूस इस्माईल शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पुण्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या तीव्रतेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करणे किंवा पोलिसांना माहिती देणे गरजेचे असताना, फॉर्च्युनर चालक डॉ. सत्यजित निघुते यांनी घटनास्थळावरून पोबारा केल्याचे फिर्यादीत स्पष्ट म्हटले आहे.

याप्रकरणी इरफान असलम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी फॉर्च्युनर कार चालक डॉ. सत्यजित निघुते यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०६(१), २८१, १२५, १२५(ब), ३२४(४)(५) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. राहाता पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पेटारे या घटनेचा पुढील सखोल तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,922
अपघात राहता पोलीस सत्यजित निघुते
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधाचा फॉर्म्युला राबविण्याच्या हालचाली सुरू…

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.