Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई
गुन्हेगारी

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा व मावा विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच कडक आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा स्थानिक गुन्हे शाखेने दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अहिल्यानगर:

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा, मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या माफियांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक मोहीम राबवत जोरदार दणका दिला आहे. 

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या विशेष आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेत गुन्हे शाखेने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल ९४ लाख ६८ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ५८ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जिल्ह्यात अवैध गुटखा व मावा विक्रीचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे निर्देश दिले होते. या सूचनांचे गांभीर्याने पालन करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ पोलीस अधिकारी व अंमलदारांची विशेष पथके तैनात केली. या पथकांनी जिल्ह्यातील अवैध मावा, पानमसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा व विक्री करणाऱ्या इसमांची गुप्ते माहिती काढण्यास सुरुवात केली.

त्यानंतर १५ जून २०२६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक छापे मारले. या विशेष मोहिमेदरम्यान एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व कारवायांमध्ये ९४ लाख ६८ हजार २९० रुपयांचा अवैध साठा व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा व मावा विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच कडक आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा स्थानिक गुन्हे शाखेने दिला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 698
अवैध धंदे अहिल्यानगर एलसीबी कारवाई गुटखा छापे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.