Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास
राजकारण

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

युवा कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक विकासकामे अधिक प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी पक्षाला मदत होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील निमोण आणि सोनेवाडी येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या कामाची पद्धत, विकासकामे मार्गी लावण्याची तत्परता आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे निमोण व सोनेवाडी परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या माध्यमातून सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार निमोण येथील अमोल आंधळे, विकास आंधळे, दीपक आंधळे, रवी शिंदे, आदेश शेळके, रिजवान पठाण, सुयोग आंधळे, सचिन मंडलिक, रितेश आंधळे, सुरज घुगे, हसन आत्तार, योगेश घुगे, प्रतीक घुगे, शिवनाथ आंधळे, संदेश शेळके, ओमकार आंधळे, विलास आंधळे, पवन सांगळे, अजय मंडलिक, फैजान शेख आणि सचिन काठे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यांच्यासह सोनेवाडी येथील शरद गोमासे, सुधीर घुगे आणि राहुल गोमासे या सर्व युवा कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
निमोण आणि सोनेवाडी परिसरातील युवा शक्ती मोठ्या संख्येने शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी झाल्याने या भागातील पक्ष संघटनेला बळकटी मिळणार आहे. युवा कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक विकासकामे अधिक प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी पक्षाला मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
निमोण आणि सोनेवाडी परिसरातील युवा शक्ती शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याने पक्ष संघटनेला निश्चितच नवी ऊर्जा आणि बळ मिळणार आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान राखून त्यांना पक्षाच्या सामाजिक आणि विकासात्मक कार्यात सक्रियपणे सहभागी करून घेतले जाईल. या परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासह तरुणांच्या अपेक्षा आणि अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आगामी काळात सातत्याने प्रयत्न केले जातील. युवा कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या जोरावर निमोण, सोनेवाडी परिसरात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू — अमोल खताळ, आमदार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 388
अमोल खताळ पक्षप्रवेश राजकारण शिवसेना शिंदे गट प्रवेश
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.