Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

टेम्पोची कसून पाहणी केली असता त्यात ४१ लाख ४१ हजार ४८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारी, तसेच १० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला, पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

अहिल्यानगर:

अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरोधात एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तब्बल ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली होती की, धाराशिवकडून बीडकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गाने घेऊन जाण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारे खर्डा पोलिसांनी जातेगाव फाटा येथे तातडीने नाकाबंदी लावली.

नाकाबंदी दरम्यान एक संशयित टेम्पो भरधाव वेगात येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन न थांबवता सुसाट वेगात बीडच्या दिशेने पळवले. पोलिसांनी अजिबात वेळ न गमावता तत्परता दाखवून त्या टेम्पोचा सिनेस्टाईल पाठलाग केला आणि तेलंगशी गावच्या शिवारात त्याला ताब्यात घेतले.

टेम्पोची कसून पाहणी केली असता त्यात ४१ लाख ४१ हजार ४८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारी, तसेच १० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला, पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपी राजू मेहबूब शेख (रा. भेंडटाकळी, ता. गेवराई, जि. बीड), प्रदीप विष्णु गायकवाड (रा. चरहाटा फाटा, ता. जि. बीड) आणि तुषार नामदेव कुसळकर (रा. बीड) या तिघांविरोधात पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर, पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, गोकुळ इंगवले, रावसाहेब नागरगोजे, शशिकांत म्हस्के, वैजिनाथ मिसाळ, बाळू खाडे, आनंद धनवडे, विष्णू आवारे, अशोक बडे, राहुल खेडकर तसेच होमगार्ड तान्हाजी जायभाय, महादेव कदम आणि राहुल भिसे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 627
खर्डा पोलीस गुटखा कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.