Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ
महाराष्ट्र संवाद विशेष

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

नारदीय कीर्तन परंपरेनुसार सादर केलेल्या या कीर्तनात त्यांनी अनेक भजनांचे सुमधुर गायन केले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर :

बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रचंड हालअपेष्टा, बहिष्कार आणि अपमान सहन करूनही अजिबात निराश न होता जगाला आशेची संजीवनी देणारे संत ज्ञानेश्वर माऊली हेच आजच्या युगातील युवकांचे खरे आदर्श असायला हवेत, असे प्रतिपादन कीर्तन-प्रवचनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी केले. 

श्रावण मासानिमित्त राजस्थान युवक मंडळाच्या वतीने आयोजित ‘मनःशांती व जीवनविकास’ या पाचव्या सलग व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात त्या बोलत होत्या.

‘विश्व स्वधर्म सूर्य पाहो’ या विषयावर आधारित सुमारे दीड तासांच्या रसाळ व ओघवत्या प्रवचनातून त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संतांचे विचार ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी असल्याचे सांगत, माणसाजवळ आर्थिक धनासोबत विचारांचे धन असेल तरच तो खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो, हे त्यांनी विविध संतांच्या ओव्या व अभंगांच्या दाखल्यांमधून स्पष्ट केले.

आयुष्यातील कडवट अनुभव पचवून माऊलींनी संपूर्ण विश्वाला नैराश्य, वैफल्य आणि नकारात्मकतेवर मात करणारा ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हा अमृतमय ग्रंथ दिला असून प्रत्येकाने या विनामूल्य उपलब्ध ज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नारदीय कीर्तन परंपरेनुसार सादर केलेल्या या कीर्तनात त्यांनी अनेक भजनांचे सुमधुर गायन केले. तसेच मालपाणी परिवाराच्या लाखो वृक्षलागवडीसारख्या सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या रचनेने कीर्तनाची सांगता झाली, याला उपस्थितांनी उभे राहून उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान शंकराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगरसेविका रचना मालपाणी यांच्या हस्ते रोहिणीताई परांजपे यांचा सत्कार झाला. प्रास्ताविकातून मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. कार्याध्यक्ष सागर मणियार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सूत्रसंचालन ओम इंदाणी यांनी केले. या सोहळ्याला उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, सचिव कृष्णा आसावा, खजिनदार वेणुगोपाल कलंत्री यांच्यासह संगमनेरमधील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 389
मनशांती व जीवन विकास रोहिणी परांजपे व्याख्यानमाला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.