Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा
सामाजिक

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

मंजूर झालेला निधी हा यशोधन कार्यालयात भरलेल्या फॉर्म मुळे - संजय कोल्हे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तालुक्यातील असंघटित आणि घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या एका वर्षात तब्बल ८ हजार ६०० कामगारांच्या बँक खात्यावर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून १० कोटी १६ लाख रुपयांचा निधी थेट वर्ग करण्यात आला असल्याची माहिती इंद्रजीत थोरात यांनी दिली.

बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सर्वांगीण विकासासोबतच गोरगरीब, निराधार, वृद्ध नागरिक व विधवा महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने यशोधन कार्यालयात असंघटित व घरेलू कामगारांसाठी एक स्वतंत्र आणि अद्ययावत विभाग सुरु करण्यात आला असून, तिथे चार पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील सहा वर्षांच्या काळात या विभागाच्या माध्यमातून सुमारे १६ हजार ५२७ नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात या विभागामार्फत कामगारांचे अर्ज भरण्यापासून ते त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, मयत कामगारांचा विमा, अपघाती विमा, मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च अशा विविध प्रस्तावांचा यशस्वी पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांमुळेच ८,६०० कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. संपूर्ण राज्यात संगमनेर तालुक्यात या योजनेचा सर्वाधिक लाभ मिळाला असून, यशोधन कार्यालयाच्या या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य कामगारांच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मदतीबद्दल कामगारांनी बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्रीताई थोरात यांचे आभार मानले आहेत.

मंजूर झालेला निधी यशोधन कार्यालयाच्या प्रयत्नांचेच फलित: संजय कोल्हे

दरम्यान, असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी स्पष्ट केले की, संगमनेर तालुक्यातील कामगारांना मिळालेली आर्थिक मदत, भांडी व इतर सर्व शासकीय सुविधा या केवळ यशोधन कार्यालयातून भरलेल्या अर्जांमुळेच मंजूर झाल्या आहेत. प्रत्यक्ष काम न करता केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून कामगारांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 545
असंघटित कामगार निधी यशोधन जनसंपर्क कार्यालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.