Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार
सामाजिक

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

संगमनेर तालुक्यात डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून राबवला जाणारा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरेल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील २७ विद्यालयांमधील दीड हजार विद्यार्थिनींना वर्षभर स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ‘मुक्कामार’ अभियान मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले असून, एकविरा फाउंडेशन आणि मुक्कामार फाउंडेशन यांच्यात नुकताच याबाबतचा महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

वडगाव पान येथील डी.के. मोरे जनता विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री तथा मुक्कामार फाउंडेशनच्या संस्थापक इशिता शर्मा आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार पार पडला.

यावेळी बोलताना अभिनेत्री इशिता शर्मा यांनी देशातील महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र चिंता व्यक्त केली. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे हा कलंक असून, मुलींनी स्वतः आत्मनिर्भर व्हावे या उद्देशाने मुक्कामार फाऊंडेशनच्या वतीने त्यांना खेळाडू आणि फायटर बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संगमनेर तालुक्यात डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून राबवला जाणारा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध मान्यवर व १५०० विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. सुधीर तांबे यांनी मुलींनी चांगला आहार घेत स्वतःला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि धाडसी बनवावे, असे आवाहन केले. कुणी त्रास दिल्यास न घाबरता तातडीने शाळा किंवा पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस दाखवावे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनने संगमनेर तालुक्यात महिला सबलीकरणासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. मुक्कामार अभियानांतर्गत २७ शाळांमधून हा उपक्रम राबवला जाणार असून, प्रत्येक शाळेतील तीन शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे शिक्षक आठवड्यातून तीन तास मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार आहेत. वर्षभर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यानंतर महाविद्यालयांमध्येही हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींनी कोणत्याही भीतीशिवाय या निर्भीड अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, गत ७ मार्च रोजी वडगाव पान येथील चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला पाच महिने लोटूनही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा मिळण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

दुर्गाताई तांबे यांनीही मनोगत व्यक्त करत वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण मुलींना सक्षम करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, असे विश्वासाने सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार बाबा ओहोळ यांनी मानले. या आगळ्यावेगळ्या आणि महत्त्वपूर्ण सोहळ्यास परिसरातील शाळांचे शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 554
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.