Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज
राजकारण

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

निमोण येथील कार्यक्रमानंतर दुपारी धांदरफळ येथील ऐतिहासिक रामेश्वर मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरणात शिवसेनेची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/08/2026Updated:24/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न राहील; मात्र आघाडी झाली किंवा नाही झाली तरी निमोण गटात शिवसेना शंभर टक्के निवडणूक लढवणार आणि जिंकणारच, असा वज्रनिर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते-पाटील यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद आणि ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ हे सूत्र घराघरात पोहोचवून आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि तालुकाप्रमुख अमर कतारी व भीमाशंकर पावसे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात शिवसेनेच्या ‘झंझावात दौऱ्याला’ आणि आढावा बैठकांना धडाक्यात सुरुवात झाली आहे.
या दौऱ्यादरम्यान रविवारी निमोण येथे शिवसेनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख सचिन कोते-पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे आणि सहसंपर्कप्रमुख दिलीप साळगट यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. याप्रसंगी विजय घुगे यांची निमोण शाखाप्रमुख म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
शाखा उद्घाटनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला. तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची नवीन शाखा सुरू करून शाखाप्रमुखांची नियुक्ती करणे, बूथ पातळीवरील संघटन मजबूत करणे आणि बूथ लेव्हल एजंट्सची फळी उभारणे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार उपतालुकाप्रमुख प्रभाकर गेठे व पंढरीनाथ घुगे यांनी मानले.
धांदरफळ येथील आढावा बैठकीत शिवसैनिकांचा एल्गार
निमोण येथील कार्यक्रमानंतर दुपारी धांदरफळ येथील ऐतिहासिक रामेश्वर मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरणात शिवसेनेची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. उपतालुकाप्रमुख बाळासाहेब कवडे, उपजिल्हाप्रमुख सदाशिव हासे, कोअर कमिटी अध्यक्ष हरीश लांडगे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, संदेश देशमुख, सोमनाथ लांडगे, दीपक मुळे, त्रंबक शिंदे, उत्तम पवार व रामदास दिघे यांच्या नियोजनाखाली ही बैठक झाली. आगामी धांदरफळ-संगमनेर खुर्द-जोर्वे गटात शिवसेनेचा फलक फडकवून पक्षाचा उमेदवार विजयी करण्याचा ठाम निर्धार या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या दोन्ही कार्यक्रमांना सहसंपर्कप्रमुख दिलीप साळगट, जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी, जिल्हा संघटक अमोल बोऱ्हाडे, उपजिल्हा संघटक रवींद्र कानकाटे, उपजिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, शहरप्रमुख अमित चव्हाण, फैसल सय्यद, बाळासाहेब घोडके, दीपक साळुंखे, आसिफ तांबोळी, संभव लोढा, अक्षय गुंजाळ, सागर भागवत, योगेश खेमनर, अमोल डुकरे, रहिम बेग, परवेज शेख, रईस आत्तार आणि स्वप्निल उदावंत यांच्यासह स्थानिक नेते चंद्रकांत घुगे, सचिन दिघे, श्याम गुडघे, बाळासाहेब पाटणे, अनिल खिल्लारी, खंडेराया सोनवणे, अतुल घुगे, संदीप सांगळे, विजय सातपुते, दीनानाथ नाईक, रवी गिरी, राजाभाऊ सातपुते, प्रकाश गायकवाड, बाबासाहेब शिंदे, अनिल गांजवे आणि गाडेकर उपस्थित होते.
तसेच महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख शितल हासे, राजश्री वाघचौरे, रेणुका शिंदे, सपना देसाई, वैशाली वडतल्ले यांच्यासह युवासेना व महिला आघाडीच्या रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या दौऱ्यामुळे संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेच्या प्रचार आणि संघटन बांधणीला मोठी गती मिळाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 855
अमर कतारी आढावा बैठक शाखा उद्घाटन शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.