Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’
राजकारण

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

पुणे-नाशिक सरळ रेल्वे सेवा सुरू झाल्यास या तरुणांना वेळेत घरी पोहोचून आईच्या हातचे जेवणही करता येईल, अशी भावना मांडत रेल्वेचा प्रश्न केवळ प्रवासापुरता मर्यादित नसल्याचे अधोरेखित केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई:
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त सोशल मीडियावर वडापावसोबत लसूण चटणी की तळलेली मिरची, असा प्रश्न विचारत पोस्ट केली. या पोस्टला प्रतिक्रिया देताना आमदार सत्यजीत तांबे यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा मांडला.
‘लसूण चटणी किंवा तळलेली मिरची? दोन्हीपैकी काहीही चालेल. फक्त पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत हा वडापाव खाण्याची संधी मिळाली पाहिजे. यासाठीच आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत,’ अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली. मात्र, या प्रतिक्रियेतून त्यांनी या रेल्वे मार्गाशी जोडलेल्या सर्वसामान्यांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या.
काहींसाठी वडापाव ही मौजमजा असेल पण, रेल्वेच्या अभावामुळे घरापासून लांब राहणाऱ्या तरूणांसाठी हीच उपजीविका आहे. त्यामुळे पुणे-नाशिक सरळ रेल्वे सेवा सुरू झाल्यास या तरुणांना वेळेत घरी पोहोचून आईच्या हातचे जेवणही करता येईल, अशी भावना मांडत रेल्वेचा प्रश्न केवळ प्रवासापुरता मर्यादित नसल्याचे अधोरेखित केले.
संगमनेरमार्गे रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी, यासाठी गेल्या काही काळापासून विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह नागरिक आणि विविध लोकप्रतिनिधींकडून या मार्गासाठी भूमिका मांडली जात आहे. या मागणीसाठी नुकतेच ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी नाशिक, संगमनेर, जुन्नर आणि शिरूर येथे जनआंदोलनही झाले. या आंदोलनांमध्ये विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते.
विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा रेल्वे मार्ग
पुणे-नाशिक थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास नाशिक, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, मंचर, खेड, चाकण आणि पुणे या भागांतील प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होऊ शकते. शिक्षण, रोजगार, उद्योग, व्यापार आणि पर्यटनासाठी या मार्गाचा मोठा उपयोग होईल, अशी भूमिका या मागणीच्या पाठपुराव्यातून मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे संगमनेरमार्गे मार्गाचा विचार व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या वडापाववरील पोस्टला उत्तर देताना आमदार तांबे यांनी कोणतीही राजकीय टीका न करता आपल्या मतदारसंघातील आणि या भागातील नागरिकांची अपेक्षा एका साध्या आणि भावनिक पद्धतीने मांडली. वडापावच्या निमित्ताने सुरू झालेली ही चर्चा थेट घरच्या जेवणापर्यंत पोहोचली आणि त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वेचा मुद्दा पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 972
अश्विनी वैष्णव नाशिक पुणे रेल्वे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.