Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती; औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश
राजकारण

कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती; औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

खताळ यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सौर प्रकल्पाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याचे आदेश दिले. यामुळे सौर प्रकल्पाची प्रक्रिया थांबली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर :

संगमनेर तालुक्यातील पठारभागातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती देण्याचे थेट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दिले आहेत. या निर्णयामुळे कौठे मलकापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या उभारणीचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला असून, पठारभागातील हजारो स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या अपेक्षांना मोठे बळ मिळाले आहे.

आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कौठे मलकापूर परिसरात एकूण २२७.५३ हेक्टर क्षेत्रावर भव्य औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे. यामध्ये सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमिनीचा समावेश आहे. मात्र, हीच जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पासाठी देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली होती. औद्योगिक वसाहतीचे नियोजन आधीपासून असताना ही जमीन सौर प्रकल्पाकडे वर्ग करण्याच्या निर्णयाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता. कौठे मलकापूर ग्रामसभेने या सौर प्रकल्पास अधिकृत नामंजुरी दिली होती. तसेच ही जागा औद्योगिक क्षेत्रासाठीच योग्य असल्याचे स्पष्ट करत तहसीलदारांनीही सौर प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. ग्रामस्थांना पूर्वकल्पना न देता काम सुरू झाल्याने स्थानिकांनी आंदोलनही छेडले होते.

स्थानिकांचा विरोध आणि संगमनेरच्या औद्योगिक विकासाची गरज लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घातले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देऊन, संबंधित १०.८३ हेक्टर जमीन सौरऊर्जा प्रकल्पा ऐवजी औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरित करण्याची आग्रही मागणी केली. आमदार खताळ यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सौर प्रकल्पाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याचे आदेश दिले. यामुळे सौर प्रकल्पाची प्रक्रिया थांबली असून, आता ही जमीन औद्योगिक वसाहतीसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहत साकारल्यास या भागात नवउद्योजक, नवीन उद्योग आणि मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन पठारभागातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल. संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

“संगमनेरच्या औद्योगिक विकासाला प्राधान्य देत स्थानिकांच्या हिताचा निर्णय व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सौरऊर्जा प्रकल्पाऐवजी औद्योगिक वसाहतीसाठी जमीन उपलब्ध होणे ही संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या निर्णयासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” — अमोल खताळ, आमदार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 665
अमोल खताळ कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्प स्थगिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.