Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान
पुरस्कार

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संदीप काकड व अंतोन मिसाळ यांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

जन आरोग्यम संचलित जाणीव फाउंडेशनच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात जीवन गौरव पुरस्कार, दंडकारण्य अभियान पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब थोरात समाज रत्न पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब थोरात टीचर आयकॉन पुरस्कारांचा समावेश आहे.

समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी जाणीव फाउंडेशनच्या वतीने ‘संगमनेर २०२६ पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवारी (३० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा देशमुख सभागृहात पार पडणार आहे.

कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या वर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी प्रा. विठ्ठलराव पानसरे (संगमनेर) यांची निवड झाली आहे. राजकीय क्षेत्रात सुरेश भिकाजी ढेरे (अकोले) व लहुजी रामभाऊ वतारे (कर्जत), क्रीडा क्षेत्रात अंबादास काशिनाथ सांगळे (संगमनेर) व जाकीर शेख (मनमाड, नांदगाव) यांचा सन्मान होणार आहे. कला क्षेत्रात अरविंद वसंत गाडेकर (संगमनेर) व रानकवी अशोक नाना आरे (ठाणे) यांचा गौरव केला जाणार आहे.

पर्यावरण विभागात दंडकारण्य अभियान अंतर्गत जय हिंद फाउंडेशन (अहिल्यानगर) आणि १४ ग्रीन फाउंडेशन (खेड, पुणे) यांचा सन्मान होणार असून, साथी राजाभाऊ अवसक (संगमनेर) यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात येईल. 

तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २० शिक्षकांना ‘शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवले जाणार आहे. यामध्ये नागसेन नरहरी भालेकर (गोवर्धा), अलका आनंदा भालेकर (संगमनेर), सविता लक्ष्मण दिवेकर (संगमनेर), नानासाहेब रामनाथ जगताप (संगमनेर), जेडगुले संजय राजाराम (संगमनेर), श्रीमती काळे शोभा अरुण (संगमनेर), चंद्रशेखर दादासाहेब चव्हाण (देवळा, नाशिक), जयेशतात्या देसले (वाणगाव), सचिन बबन ठाणगे (पारनेर), मिना अरुण पवार (राहुरी), पुंडे पोपट बाबासाहेब (पाथर्डी), दिलीप हरी पिवड (अकोले), हासे चंद्रशेखर मारुती (अकोले), संपत विठ्ठल धारे (पाथर्डी), विजय पवार (संगमनेर), दीपक दामोदर काशिद (पुणे), भास्कर बाबुराव गाडे (अकोले), श्रीमती निंबाळकर ज्योती विजय (संगमनेर), मच्छिंद्र किसन गोसावी (संगमनेर) आणि योगेश अंबादास दराडे (अकोले, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यासाठी मारुतीशेठ शिंदे, गोरक्षनाथ मदने, अमित पाटणकर, बाळासाहेब हेंद्रे, बाळासाहेब पुलाटे, अभिजीत पाटणकर, संदीप काकड, ज्ञानदेव गायकर आणि सतीश गोर्डे हे संयोजन समितीत कार्यरत आहेत. समन्वयकाची धुरा भाऊसाहेब काकड, भाऊसाहेब यादव, प्रणव काकड, विद्युत काकड, स्वानंद पाटणकर, अंतोन मिसाळ, विजय काकड, हर्षल हेंद्रे, ॲड. रश्मी मिसाळ, ॲड. निकिता हेंद्रे आणि नीरज काकड सांभाळत आहेत.

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संदीप काकड व अंतोन मिसाळ यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 978
जाणीव फाउंडेशन पुरस्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आदित्य कडलग यांची जागतिक विमा परिषदेसाठी ऐतिहासिक निवड; संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

29/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात गुरुवारी दुपारी एक अत्यंत…

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.