Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

संगमनेरात २८ सप्टेंबरला बालकुमार साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी – दुर्गाताई तांबे

23/09/2026

खाकीच्या आडोश्याने भलतेच उद्योग! संगमनेरात पोलीस प्रशासनाची अब्रू वेशीवर; कटकारस्थानाने संपूर्ण तालुका हादरला

23/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे रेल्वे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीकडून तीव्र निषेध
राजकारण

नाशिक-पुणे रेल्वे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीकडून तीव्र निषेध

"शिर्डी रेल्वेला विरोध करणाऱ्यांवर साईबाबा कोपतील" अशा आशयाचे विधान करणे हे केवळ दुर्दैवी नसून लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारे आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
राज्याचे गोदावरी व कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे रेल्वे हा लाखो नागरिकांच्या विकासाशी थेट जोडलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा गंभीर आणि तांत्रिक प्रश्नावर वस्तुनिष्ठ भूमिका मांडण्याऐवजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साईबाबांच्या नावाचा आधार घेत शिर्डी मार्गाला विरोध करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे.
“शिर्डी रेल्वेला विरोध करणाऱ्यांवर साईबाबा कोपतील” अशा आशयाचे विधान करणे हे केवळ दुर्दैवी नसून लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारे आहे. राज्यघटनेवर निष्ठा ठेवणाऱ्या एका लोकप्रतिनिधीकडून विकासाच्या मुद्द्याला धार्मिक स्वरूप देणे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी भाषा वापरणे हे जबाबदार पदाला शोभणारे नाही, असे कृती समितीने स्पष्ट केले आहे.
साईबाबांनी आपल्या हयातीत सदैव ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश दिला असून त्यांनी कधीही मतभिन्नता असलेल्यांबद्दल द्वेष वा सूडाची भावना व्यक्त केली नाही. त्यामुळे साईबाबांच्या शिकवणीचा वापर करून नागरिकांना इशारे देणे हे त्यांच्याच विचारांचा अवमान करण्यासारखे आहे. संगमनेरच्या नागरिकांची भूमिका ही कोणत्याही धार्मिक स्थळाच्या वा शहराच्या विरोधात नसून, संगमनेरला न्याय मिळावा आणि तांत्रिक, आर्थिक व भौगोलिकदृष्ट्या योग्य असाच मार्ग निश्चित व्हावा अशीच आहे. मात्र या जनभावनेचा आदर करण्याऐवजी धार्मिक भावना पुढे करून मुख्य विषय भरकटवला जात असल्याची खंत समितीने व्यक्त केली आहे.
याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या विधानाबाबत तातडीने स्पष्टीकरण देऊन संगमनेरकरांची दिलगिरी व्यक्त करावी, अशी ठाम मागणी कृती समितीने केली आहे. अन्यथा नाशिक-पुणे रेल्वे प्रश्नावर जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि आंदोलनाची धार कोणत्याही परिस्थितीत बोथट होऊ न देण्याचा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन समितीचे समन्वयक सतीश खताळ, रवींद्र हासे, प्रवीण हासे, रामेश्वर पानसरे, प्रितम साबळे, प्रशांत पानसरे, सनी अभंग, अनिल राऊत, अजय हासे, शिवाजी जगताप, विजय उदावंत, अमोल शेलकर, शिवाजी गुंजाळ, निलेश गुंजाळ, प्रकाश कडलग, समीर लामखडे, राहुल गायकर, मोहसीन शेख, निलेश गुंजाळ, अनिल गुंजाळ, संदीप काकड, डॉ. सचिन वाळे, ॲड. अनिल गोडसे, राम अरगडे, आनंद खतोडे, अरुण चव्हाण, ओंकार बिडवे, सत्यजित थोरात, प्रदीप हासे आणि प्रवीण काकड आदींनी दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,796
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात १०२ कोटींच्या विकासकामांचा धडाका; उद्या पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

22/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

By Annant Ppangarkar23/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – चेक अनादर प्रकरणात संगमनेरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रसाद जोशी यांनी…

संगमनेरात २८ सप्टेंबरला बालकुमार साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी – दुर्गाताई तांबे

23/09/2026

खाकीच्या आडोश्याने भलतेच उद्योग! संगमनेरात पोलीस प्रशासनाची अब्रू वेशीवर; कटकारस्थानाने संपूर्ण तालुका हादरला

23/09/2026

बुधवार, २३ सप्टेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य

23/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.