What's Hot

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उद्या बुधवारी (२३ सप्टेंबर) आयोजित करण्यात आला आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे. 

आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या अंतर्गत चिंचोली गुरव येथे ४ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन होणार असून यामुळे परिसरातील शेतीला सिंचनाचा मोठा लाभ मिळणार आहे. तसेच समनापूर येथील गणपती मंदिर परिसरात ९७ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या संगमनेर ते वडगाव पान फाटा आणि निळवंडे ते कौठे कमळेश्वर या राष्ट्रीय महामार्ग मार्गावरील रस्ते सुधारणा कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

याशिवाय संगमनेर नगरपरिषद हद्दीतील साई नगर येथील म्हाळुंगी नदीवरील पुलाचे ‘स्व. खासदार बाळासाहेब विखे साईसेतू’ असे नामकरण करून नामफलकाचे अनावरण केले जाईल. तसेच गंगामाई घाटावर ४० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या हिंदू दशक्रिया विधी घाटाचे लोकार्पण आणि श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर येथील ३० लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे लोकार्पणही होणार आहे.

तालुक्यातील या महत्त्वकांक्षी विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply