Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्रकारावर हल्ला करून फरार झालेले तीन आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हेगारी

पत्रकारावर हल्ला करून फरार झालेले तीन आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी हेमंत उर्फ सोनू कोहक आणि प्रशांत निक्रड हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अहिल्यानगर:
वृत्तपत्रामध्ये विरोधी बातम्या छापल्याच्या रागातून आणि अपघाताच्या कारणावरून पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, समतानगर सावेडी येथील पत्रकार सुशिल थोरात (वय ४९) यांच्या कारला २० ऑगस्ट २०२६ रोजी सोनू कोहक याने मोपेडवरून धडक दिली होती. या अपघाताच्या कारणावरून तसेच विरोधी बातम्या लावल्याच्या रागातून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी पहिलवानाने पत्रकार थोरात आणि त्यांच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सोनू कोहक व इतरांनी थोरात यांना खाली पाडून त्यांच्या डोक्यात व पाठीवर दगडाने मारून, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पत्रकारावरील प्राणघातक हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ आरोपी शोधण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, संदीप दरवडे आणि दोन विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथक प्रथम राजगुरूनगर (पुणे) येथे पोहचले; मात्र आरोपी तेथून पसार झाले होते. त्यानंतर आज सोमवारी (२४ ऑगस्ट) आरोपी छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज, पंढरपूरजवळील एमआयडीसी परिसरात असल्याची पक्की माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक (वय २७, रा. बोल्हेगाव), महेश उर्फ पप्पू दशरथ मते (वय २७, रा. सावेडी) आणि प्रशांत शिवाजी निक्रड (वय २५, रा. सावेडी) या तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी पत्रकार सुशिल थोरात व त्यांच्या मुलास मारहाण केल्याची कबुली दिली. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी हेमंत उर्फ सोनू कोहक आणि प्रशांत निक्रड हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिन्ही आरोपींना तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 531
अहिल्यानगर एलसीबी पत्रकार हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.