Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी

सोहळ्यात मातंग समाजातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ठरलेल्या प्रेरणा खवळे यांच्यासह प्रा. रघुनाथ खरात यांना 'जीवनगौरव' तर डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. भाऊसाहेब पवार, प्रा. तुकाराम सोळशे, प्राचार्य काळूराम बोरुडे, मिराबाई आव्हाड आणि प्राचार्य चंद्रकांत चव्हाण यांना 'समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे आणि महानगरीय साहित्याचा पाया रचणारे सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली. 

मालपाणी लॉन्स येथे आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती सोहळा व गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यात मातंग समाजातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ठरलेल्या प्रेरणा खवळे यांच्यासह प्रा. रघुनाथ खरात यांना ‘जीवनगौरव’ तर डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. भाऊसाहेब पवार, प्रा. तुकाराम सोळशे, प्राचार्य काळूराम बोरुडे, मिराबाई आव्हाड आणि प्राचार्य चंद्रकांत चव्हाण यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विश्वास पाटील म्हणाले की, अण्णाभाऊंचे जीवन अत्यंत संघर्षाचे होते आणि त्यांच्या ‘फकीरा’ व ‘माकडीचा चाळ’ या कादंबऱ्या साहित्य जगतासाठी अजिंठा-वेरूळसारख्या अमूल्य कलाकृती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, याबद्दल खंत व्यक्त करत त्यांनी अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली.

कार्यक्रमात बोलताना काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी महापुरुषांना एका ठरावीक जातीत न बांधता त्यांच्या मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले, तसेच संविधानाचे रक्षण करणे हीच काळाची गरज असल्याचे सांगितले.

आमदार सत्यजित तांबे यांनी तरुणांना सॅल्यूट मारण्याऐवजी सॅल्यूट घेणारे अधिकारी बनण्याचा सल्ला दिला, तसेच संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासोबतच अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक उभारले जाणार असल्याची माहिती दिली.

यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अशा व्याख्यानांमुळे तरुणांना योग्य दिशा मिळत असल्याचे सांगत जंतर-मंतरवरील आंदोलनाने विद्यार्थ्यांमध्ये हक्कांची जाणीव निर्माण केल्याचे नमूद केले. तर नवनिर्वाचित आयएएस अधिकारी प्रेरणा खवळे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देत विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणींना न घाबरता ध्येयाकडे वाटचाल करावी असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन निलेश पर्बत यांनी तर आभार दत्तात्रय अवचिते यांनी मानले. या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 282
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.