Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मातोश्री प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनातूनच हरित भविष्याची पायाभरणी: आमदार अमोल खताळ
सामाजिक

मातोश्री प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनातूनच हरित भविष्याची पायाभरणी: आमदार अमोल खताळ

खताळ म्हणाले, गणेश धात्रक यांनी वृक्षारोपण करण्याचा केलेला संकल्प अत्यंत कौतुकास्पद आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. वृक्षलागवडीच्या माध्यमातून परिसरातील हिरवाई वाढविण्यासोबतच गावाचे सौंदर्य आणि पर्यावरण समृद्ध करण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

तालुक्यातील घारगाव येथील विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष गणेश धात्रक यांच्या मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घारगाव–शिदायकवाडी रस्त्यालगत शेत परिसरातील डोंगरावर आमदार खताळ यांच्या हस्ते वडासह करवंदाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

याप्रसंगी घारगावचे सरपंच नितीन आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शैलेश फटांगरे, माजी उपसरपंच संदीप आहेर, सदस्य मंगेश कान्होरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आहेर, जगदीश धात्रक, दशरथ गाडेकर, सोमनाथ रोडे, लहू आभाळे, खंडू जाधव, अमित शेळके, राजेंद्र धात्रक, गणेश आभाळे, सचिन बोडके, पूजा सोनवणे, ललित कान्होरे, दिनेश भालेराव, राहुल धात्रक, वैभव धात्रक, मंगेश भुतांबरे, उत्तम काळे यांच्यासह शिवसेना महायुती कार्यकर्ते तसेच धात्रक परिवारातील सदस्य उपस्थित होते 

खताळ म्हणाले, गणेश धात्रक यांनी वृक्षारोपण करण्याचा केलेला संकल्प अत्यंत कौतुकास्पद आहे. वाढदिवस, विविध समारंभ अथवा महत्त्वाच्या दिवसांचे औचित्य साधून केवळ शुभेच्छा देण्याऐवजी प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प केला पाहिजे. मात्र, झाड लावणे एवढेच महत्त्वाचे नसून त्याचे नियमित संगोपन करून ते मोठे होईपर्यंत त्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. वृक्षसंवर्धनासोबतच जलसंवर्धनाचीही जोड देणे काळाची गरज आहे.

झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होते. परिसरातील हिरवाई वाढण्यासोबतच पाऊस, माती आणि जलस्रोतांचे संवर्धन होण्यासही वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विशेषतः तरुण पिढीने पुढाकार घेऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची ही चळवळ गावागावात पोहोचवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 442
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अकोले तालुक्यातील कोतूळ…

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.