Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय
धार्मिक

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असल्याने सायंकाळच्या सुमारास कोतूळ–राजूर रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अकोले तालुक्यातील कोतूळ येथील प्राचीन, जागृत व नवसाला पावणारे श्री वरदविनायक मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. पहाटेपासूनच श्री गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. परिसरातील अनेक भाविकांनी अनवाणी पायी येऊन श्री वरदविनायकाचे दर्शन घेत नवसपूर्ती केली.

अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटे ५ वाजता प्रभातगीत गायनाने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी प्रणव परशुरामी यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. दिवसभर जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सायंकाळी मंदिर परिसरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले. विद्या परशुरामी, प्रज्ञा भाटे, वृषाली समुद्र व प्रियांका पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने भाविकांनी अथर्वशीर्ष पठणात सहभाग घेतला. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला.

यानंतर सौ. पल्लवी व डॉ. सतीश वाळुंज यांनी सपत्नीक श्री वरदविनायकाची महाआरती केली. देवस्थानच्या वतीने विनय समुद्र यांनी त्यांचा सन्मान केला.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घेतले श्री वरदविनायकाचे दर्शन-

अंगारकी चतुर्थीनिमित्त अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी श्री वरदविनायक मंदिराला भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाविकांसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी डॉ. सुभाष सोमण, डॉ. कपिल कातोरे, डॉ. गोरक्ष वाकचौरे, डॉ. संतोष देशमुख डॉ. सोपान कवडे, डॉ. उत्तम गुंजाळ, डॉ. अभिजित देशमुख, रविंद्र आरोटे, योगेश देशमुख, भाऊसाहेब पोखरकर, बाबाजी देशमुख, योगेश समुद्र, अविनाश गिते, अजित आरोटे, सागर सोनुले, सुभाष घाटकर, प्रदीप नेवासकर यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांना देवस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असल्याने सायंकाळच्या सुमारास कोतूळ–राजूर रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 41
किरण लहामटे गणेश दर्शन चतुर्थी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अकोले तालुक्यातील कोतूळ…

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.