Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी
सामाजिक

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

जप्त केलेल्या संशयित दारूचे अन्न व औषध प्रशासन तसेच अधिकृत प्रयोगशाळेत तातडीने परीक्षण करण्यात यावे आणि आरोग्यास घातक घटक आढळल्यास संबंधितांवर कडक कलमांखाली गुन्हे दाखल करावेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर: 

संगमनेरमध्ये अवैध दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठे कारवाई केली. संबंधित ठिकाणी सातत्याने कारवाया झाल्याने आरोपींच्या आस्थापना कायमस्वरूपी सील करण्याची मागणी दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.

संगमनेर शहरात गोवा बनावटीची व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरोधात संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत ‘रॉयल इम्पॅक्ट’ व्हिस्कीचे ३४ बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट दारू बनवण्याचे साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पथकाने शिवाजी नगर, वडजे मळा परिसरातील एका घरावर छापा टाकून शिवकुमार मनोजकुमार कालडा व सौरभ अरविंद पापडे या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून संगमनेर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नेहरू चौकातील हॉटेल सुरभी (FL-3) पर्यंत पोहोचल्याने तेथूनही ६१ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असले तरी, केवळ किरकोळ छापे मारून हा प्रकार थांबणार नाही, अशी आक्रमक भूमिका दारूबंदी कृती समितीने घेतली आहे. ज्या ठिकाणी अवैध किंवा बनावट दारू विक्री आढळेल, त्या आस्थापनेचा परवाना रद्द करून ती कायमस्वरूपी सील करण्यात यावी, अशी स्पष्ट अमर कतारी यांनी केली आहे. शहरात टपरीपासून ते हॉटेल आणि बारपर्यंत बनावट दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत असल्याने प्रशासनाने केवळ देखावा न करता कठोर पावले उचलावीत, असे कतारी यांनी नमूद केले.

बनावट दारू ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे जप्त केलेल्या संशयित दारूचे अन्न व औषध प्रशासन तसेच अधिकृत प्रयोगशाळेत तातडीने परीक्षण करण्यात यावे आणि आरोग्यास घातक घटक आढळल्यास संबंधितांवर कडक कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, असा आग्रह कतारी यांनी धरला आहे.

सध्या आखाड महिन्याचे शेवटचे दिवस असल्याने दारूची अवैध विक्री वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाने संगमनेर शहर व तालुक्यात संयुक्त विशेष धडक मोहीम राबवून अवैध दारू विक्रेते आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने कोणत्याही दबावाला किंवा संगनमताला बळी न पडता नियमित तपासणी चालू ठेवावी, जेणेकरून कारवाईनंतर पुन्हा त्याच ठिकाणी अवैध धंदे सुरू होणार नाहीत. दारूबंदी कृती समितीने केलेल्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आणि अवैध दारू विक्री रोखण्यासाठी ठोस धोरण न आखल्यास संगमनेरमधील नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अमर कतारी यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 821
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना…

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.