Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले
महाराष्ट्र संवाद विशेष

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

अंभोरे घाटात दुचाकीस्वारांवर बिबट्याचे हल्ले; वनविभागाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थ आक्रमक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अकोले / संगमनेर: 

कुंभेफळ येथे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या अंकुर प्रशांत कोटकर या तीन वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. बालकाच्या आई, आजी, आजोबा आणि शेतातील कामगारांनी तातडीने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला आणि बालकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. 

या हल्ल्यात जखमी झालेल्या अंकुरवर प्रथम सुगाव येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पोपट कोटकर, बबन झोळेकर आणि वनपरीक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी बालकाची विचारपूस केली. या घटनेमुळे कुंभेफळ परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने परिसराची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कुंभेफळ परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने धोक्याची घंटा ठरत आहे. यापूर्वी मे महिन्यातही याच परिसरात श्रीशा वैभव शिंदे या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला होता, त्यावेळीही नागरिकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली आहे.

अंभोरे घाटात दुचाकीस्वारांवर बिबट्याचे हल्ले; वनविभागाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थ आक्रमक – अंभोरे घाट परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण गंभीररीत्या वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी डिग्रस येथील जयश्री सोमनाथ पवार या दुचाकीवरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. तसेच याच परिसरात अरुण राजू बर्डे (वय १७) याच्यावरही बिबट्याने हल्ला केला. या दोघांवरही रुग्णालयात उपचार करण्यात आले. वाहनांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने घाट परिसरात रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे सावट आहे. या गंभीर समस्येकडे वनविभागाला वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला असून, घाटात तातडीने ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 571
दुर्दैवी बालकावर हल्ला बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

By Annant Ppangarkar06/10/20260

संगमनेर | प्रतिनिधी सोमवारी (५ ऑक्टोबर) दिल्ली नाका परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने गतिरोधक…

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.