Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026

अपहरण झालेल्या बालिकेची अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका; दोन्ही आरोपींना अटक

22/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

याप्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. विशेषतः अमावस्या, पौर्णिमा व अष्टमीच्या आदल्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित हालचाली करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर | पंकज पडवळ
संगमनेर शहरातील लॉ कॉलेजच्या पाठीमागील भागात असलेल्या घुलेवाडी परिसरातील एकता चौकात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अघोरी व तांत्रिक वस्तू टाकण्याचे प्रकार समोर येत असल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. हा परिसर उच्चशिक्षित नागरिक, व्यावसायिक आणि शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांची वस्ती म्हणून ओळखला जातो. अशा सुशिक्षित भागातच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य वारंवार घडत असल्याने स्थानिक रहिवाशांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमीच्या दिवशी एकता चौकात संशयास्पद वस्तूंचा खच पाहायला मिळतो. यापूर्वी अनेकदा येथे चपलांचे ढीग, शेंदूर लावलेले नारळ आणि कणकेचे पेटते दिवे आढळून आले आहेत. शनिवारी सकाळी या प्रकाराने अधिकच गंभीर व भीतिदायक वळण घेतले.
चौकात एका कोहळ्यावर दोन डोळे आणि तोंड तयार करून तो ठेवण्यात आला होता. त्याच्याच शेजारी दही-भाताचा नैवेद्य दाखवून त्यावर कुंकूसदृश पदार्थ शिंपडण्यात आला होता. सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक, शाळेत जाणारी लहान मुले आणि विविध क्लाससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण परिसरात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले.
या संपूर्ण घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्या पोलखाली या अघोरी वस्तू वारंवार टाकल्या जात आहेत, त्याच पोलवर प्रशासनाचा सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. भरचौकात आणि कॅमेऱ्याच्या थेट नजरेखाली हा सर्व प्रकार घडत असतानाही संबंधित अज्ञात व्यक्ती मोकाट कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ रस्त्यावरील वस्तू हटवून हा प्रश्न मिटणारा नाही, तर अंधश्रद्धेच्या नावाखाली समाजात भीती पसरवणाऱ्या या विकृत मनोवृत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणे गरजेचे बनले आहे.
याप्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. विशेषतः अमावस्या, पौर्णिमा व अष्टमीच्या आदल्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित हालचाली करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा. तसेच या भागात रात्रीच्या वेळी पोलिसांची नियमित गस्त वाढवून दोषींवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका घुलेवाडीतील रहिवाशांनी घेतली आहे.
आता या प्रकरणाचा तपास करून पोलीस प्रशासन नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती कधी दूर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 215
अंधश्रद्धा मागणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026

संगमनेरकरांचे स्वप्न अखेर पूर्ण! आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश, जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण!

17/08/2026

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

15/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

By Annant Ppangarkar22/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | पंकज पडवळ संगमनेर शहरातील लॉ कॉलेजच्या पाठीमागील भागात असलेल्या…

अपहरण झालेल्या बालिकेची अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका; दोन्ही आरोपींना अटक

22/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

22/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.